WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी ! eKYC  OTP येत नाही मग लवकर करा हे काम 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana eKYC :  महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि फायद्याची ठरत आहे. राज्यातील लाखो महिला या योजनेतून प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत घेत आहेत. पण आता या योजनेतील एक नवा नियम लागू करण्यात आला आहे, त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे चिंता वाढली आहे. आता सरकारने स्पष्ट केले आहे की जर महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर  eKYC करणे अनिवार्य आहे.

दोन महिन्यांमध्ये KYC केली नाही तर लाभ होणार बंद 

Ladki Bahin Yojana eKYC
Ladki Bahin Yojana eKYC

राज्य सरकारने यासाठी ऑनलाइन प्रोसेस सुरू केली असून महिलांना दोन महिन्याचा कालावधी देखील देण्यात आला आहे. या वेळेमध्ये महिलांनी केवायसी पूर्ण केली तरच योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे. म्हणजेच प्रत्येक महिन्याला मिळणारी आर्थिक मदत थांबणार आहे त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांनी हा नियम गंभीरपणे घेऊन आपली केवायसी करणे खूप गरजेचे आहे. 

पण खरी समस्या अशी आली आहे की  kyc करताना अनेक महिलांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. कधी साइट उघडत नाही तर कधी ओटीपी येत नाही , तर कधी माहिती भरताना इरर दाखवत आहे. मग आता अशा परिस्थितीमध्ये अनेक महिलांची चिंता वाढली आहे परंतु आता यावर देखील एक उपाय आला आहे. 

17,500 अर्ज बाद 

मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत तब्बल 17500 महिलांचे अर्ज तांत्रिक किंवा चुकीच्या माहितीमुळे बाद झाले आहेत. हा आकडा पाहून बाकीच्या लाभार्थी महिलांमध्ये मोठी चिंता वाढली आहे, विशेषता ग्रामीण भागातील महिलांना ऑनलाईन प्रक्रिया नीट समजत नाही त्यातच मोबाईल नेटवर्कची समस्या तांत्रिक अडचणी आणि माहितीच्या अभावामुळे अनेकदा चुकीची माहिती भरली जात आहे. 

Ladki Bahin Yojana eKYC
Ladki Bahin Yojana eKYC

या योजनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की जर लाभार्थ्यांनी चुकीची माहिती भरली तर, त्यांचा अर्ज बाद होऊ शकतो आणि योजनेचा लाभ बंद होऊ शकतो त्यामुळे घाईघाईत काम न करता काळजीपूर्वक योग्य माहिती भरून आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. 

eKYC करताना साइटवर तांत्रिकी अडचणी 

लाडकी बहीण योजनेचे पोर्टल सुरू झाल्यानंतर हजारो महिला एकाच वेळी केवायसी करण्यासाठी लॉगिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे साइटवर मोठा लोड येतो आणि सिस्टम डाऊन होतं, परिणामी अनेक महिलांना  अनेक तास बसून देखील केवायसी पूर्ण होत नाही. यामध्ये महिलांना अनेक अडचणी निर्माण होतात जसे की कधीकधी ओटीपी येत नाही तर कधी ओटीपी आल्यानंतर माहिती भरता वेळेस इरर दाखवत आहे.

यावर उपाय काय ? 

Ladki Bahin Yojana eKYC
Ladki Bahin Yojana eKYC

या सर्व गोंधळावर उपाय शोधण्यात आला असून अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलांनी एकाच वेळी केवायसी करण्याचा प्रयत्न करू नये. एकाच वेळी साइटवर जास्त लोड पडतो आणि साईट डाऊन होत आहे, त्यामुळे तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नाही. तज्ञांनी सांगितले की “रात्री 12 किंवा पहाटे 4 ते 5  वाजता” लॉगिन करून एक केवायसी केली तर प्रक्रिया सोपी होईल या वेळेत साइटवर लोड कमी असतो त्यामुळे केवायसी लवकरात लवकर पूर्ण होईल.

ई kyc घोटाळा 

याच दरम्यान एक मोठी बातमी देखील समोर आली आहे, eKYC प्रक्रियेमध्ये मोठा घोटाळा होत आहे.  यामध्ये काही बनावट वेबसाईट आणि फसवे कॉल करून महिलांची वैयक्तिक माहिती व बँक डिटेल घेतली जात आहे. चुकीच्या लिंक वर क्लिक केल्यास किंवा ओटीपी सांगितल्यास तुमचं खातं रिकामा होऊ शकतो. 

Ladki Bahin Yojana eKYC
Ladki Bahin Yojana eKYC

ग्रामीण भागातील महिलांसाठी मोठी आव्हान : 

ग्रामीण भागात इंटरनेट आणि मोबाईल वापर अजून देखील कमी आहे. अनेक महिलांकडे स्वतःचा स्मार्टफोन नाही अशावेळी त्यांना इतरांच्या मोबाईलवर अवलंबून राहावं लागतं त्यामुळे फसवणुकीची शक्यता जास्त वाढते.  जर तुमच्याकडे मोबाईल नसेल तर तुम्ही तुमच्या गावातील इंटरनेट कॅफेमध्ये म्हणजेच ऑनलाइन सेंटरमध्ये जाऊन देखील तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. 

लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक आधार देणारी व्यवस्था आहे परंतु आता सरकारने  सरकारने घातलेल्या केवायसी च्या अटीमुळे अनेक महिलांचे टेन्शन वाढले आहे. तरीसुद्धा केवायसी करणं अनिवार असल्याने प्रत्येक लाभार्थी महिलेने वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे जर वेळेमध्ये तुम्ही  ekyc प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला या योजनेमधून बाद केले जाणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!