Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेत राज्यभरातील लाखो महिलांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केल्यानंतर अनेक महिलांना अडचणींना सामोरं जावं लागत होतं. कारण ई-केवायसी करताना पती किंवा वडिलांचा आधारकार्ड क्रमांक देणे आवश्यक करण्यात आले होते. मात्र राज्यातील अनेक महिला विधवा, घटस्फोटित किंवा वडील-पती दोघेही हयात नसल्याने त्यांच्याकडे आधार उपलब्ध नव्हता. त्यामुळे अनेक पात्र महिलांचा लाभ थांबण्याची भीती निर्माण झाली होती.
हे पण वाचा | लाडकी बहीण योजना E kyc प्रक्रिया येथे क्लिक करा
अखेर या महिलांसाठी शासनानं मोठा दिलासा दिला आहे. सध्या तरी अशा महिलांचा लाभ बंद केला जाणार नाही, उलट त्यांना हप्ता चालू ठेवण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. शासनानं स्पष्ट केलं आहे की, वडील वारलेले, पतीही नसलेले किंवा घटस्फोटित महिलांचा हप्ता सध्या बंद होणार नाही. येत्या काही दिवसांत त्यांच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे.

योजनेचा हेतू पारदर्शकता आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंतच आर्थिक मदत पोहोचवण्याचा आहे. त्यामुळे ई-केवायसी प्रक्रियेत महिलेला स्वतःचा तसेच पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक देणे आवश्यक ठरवण्यात आले आहे. या माध्यमातून शासन संबंधित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तपासणार आहे, जेणेकरून अपात्रांना लाभ मिळू नये.
हे पण वाचा | लाडकी बहीण योजना E kyc प्रक्रिया येथे क्लिक करा
ई-केवायसीची मुदत १८ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे अजूनही ज्यांनी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती लवकरात लवकर करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा पुढील हप्ता थांबण्याची शक्यता आहे. मात्र शासनाने दिलेल्या या नव्या निर्णयामुळे निराधार, विधवा आणि एकल महिलांना मोठा दिलासा मिळाल्याचं स्पष्ट दिसतंय.

ही योजना फक्त आर्थिक मदत नव्हे, तर महिलांच्या सन्मानाचा मुद्दा आहे. शासनानं घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना हायसं वाटलं आहे. समाजातील प्रत्येक “लाडकी बहीण” सुरक्षित, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर व्हावी हेच या योजनेचं खरं उद्दिष्ट आहे.
हे पण वाचा | लाडकी बहीण योजना E kyc प्रक्रिया येथे क्लिक करा

