Intelligence bureau Bharti : सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी ! केंद्र सरकारचे अंतर्गत काम करणाऱ्या गुप्तचर विभागांमध्ये भरती जाहीर झाली आहे. देशी सेवेची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी समोर आली आहे, या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला फक्त दहावी पास असणे आवश्यक आहे.
या भरतीची जाहिराती गृह मंत्रालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे, या भरतीमध्ये सुरक्षा सहाय्यक पदाच्या एकूण 455 पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जे विद्यार्थी सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी राहणार आहे. एक स्थिर आणि चांगली नोकरी म्हणजे सर्व तरुणांचे स्वप्न अशा शोधामध्ये असणाऱ्या युवकांसाठी महत्वाची बातमी.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे, जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत आणि इच्छुक आहेत असे उमेदवारांनी www.mha.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज करू शकता. या भरतीला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 सप्टेंबर 2025 असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेमध्ये आपला अर्ज भरून घ्यायचा आहे.
सुरक्षा सहाय्यक या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किंवा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व उमेदवाराकडे मोटर वाहन चालवण्याचा वैध परवाना असणे आवश्यक आहे, प्रशिक्षण असून चालणार नाही तर वाहन चालवण्याचा अनुभव देखील या पदासाठी लागणार आहे.

वयोमर्यादा किती ?
या भरतीला अर्ज करण्यासाठी वय मर्यादा ही 18 ते 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कॅटेगिरी नुसार सवलती असणार आहेत यासाठी तुम्हाला अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी लागणार आहे.
निवड प्रक्रिया !
या पदासाठी निवड प्रक्रिया ही सर्वप्रथम उमेदवाराला लेखी परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. आणि कौशल्य चाचणीचे आधारे होणार आहे, उमेदवारांनी या भरतीसाठी योग्य अभ्यास करून तयारी करायची आहे. देशाच्या सुरक्षेची संबंधित विभागात काम करण्याची ही एक जबाबदारीची संधी आहे, त्यामुळे उमेदवारांची निवड प्रक्रिया ही काटेकोरपणे घेण्यात येणार आहे.
आजकाल सर्वसामान्य कुटुंबातील तरुण आपल्या परिस्थितीमुळे जास्त शिक्षण घेता येत नाही. अशा तरुणांसाठी ही एक संधी आहे, कारण की या तरुणांनी शिक्षण नसल्यामुळे मोठमोठ्या नोकऱ्यांची संधी गमावली आहे. त्यांच्यासाठी ही भरती एक वरदान म्हणून समोर आली आहे, या भरती करिता उमेदवाराला केवळ दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे देशाचे गुप्तचर विभागात काम करण्याची एक संधी मिळत आहे.

देशातील तरुणांसाठी देश सेवेसाठी, ही एक संधी आहे तरुणांनी फक्त एक नोकरी नाही तर देश सेवेच्या भावनेने ही संधी स्वीकार करावी, एकदा का तुम्ही या सेवेत दाखल झाले की तुम्हाला फक्त पगारात नाही तर सामाजिक प्रतिष्ठ्या देशासाठी काम करण्याचा अभिमान आणि आयुष्यासाठी सुरक्षितेचा पाठिंबा मिळणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे !
- पद : सुरक्षा सहाय्यक ( मोटार वाहतूक )
- पदसंख्या : 455
- शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण + ड्रायव्हिंग लायसन्स
- वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षीय
- पगार : 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट : www.mha.gov.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 सप्टेंबर 2025
