Heavy rain damage compensation 2025 | अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात पिकवून गेले उभपिक आडवं झालं आणि शेतकऱ्यांचा संसार उध्वस्त झाला. दिवाळी जवळ आली, पण घरातला चूल खंड पडेल की काय अशी भीती शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरील दिसत होती. परंतु आता यात संकटाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेला शब्द आता प्रत्यक्षात उतरू लागलेला आहे , सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई पोचण्यास सुरुवात केली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांना मदतीच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 480 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशिम आणि संभाजीनगर विभागातील जालना आणि हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे आता शासनाच्या मदतीमुळे या शेतकऱ्यांचे घरामध्ये थोडा प्रकाश पडणार आहे.
सरकारने यापूर्वी 31 हजार कोटीची मोठी पॅकेज जाहीर केली होती. आणि याचाच भाग म्हणून ही मदत वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे पुढील काही दिवसात इतर जिल्ह्यांसाठी शासन निर्णय घेण्यात येणारा असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्ती म्हणजे फक्त वादळ पूर किंवा दुष्काळ एवढंच नाही तर, अवेळी पाऊस, अतिवृष्टि, वीज कोसळणे, सतत पाऊस यासारख्या स्थानिक आपत्तीचा ही समावेश करण्यात आला आहे. 2014 पासून राज्य सरकारने हे धोरण राबवला असून 2023 मध्ये त्यात आणखी सुधारणा केली आहे आणि त्यानुसार खरीप 2025 आणि पुढील हंगामासाठी नुकसान भरपाई दर आणि निकष ठरवण्यात आले आहेत.
आजचा शेतकरी संघटन उभा राहताना दिसतोय पण प्रश्न असा आहे की मर्जीचा हात खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मलमपट्टी ठरेल का ? दिवाळी दिवे लागतील खरी पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातील काळूक कधी पोचला जाईल हा विचार मात्र प्रत्येकांच्या मनाला चटका लावणार आहे.