तब्बल 18,600 रुपयांनी स्वस्त? | सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेले आहे, जर तुम्ही देखील सोने दिवाळीसाठी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच आनंदाची ठरणार आहे. कारण, आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरमध्ये वाढ झाल्याने महिला व नागरिकांमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले होते. महिला म्हणत होत्या आता कसं सोनं खरेदी करावं आमची हाऊस कशी पूर्ण करावी. एवढा मोठा सण आणि यामध्ये थोडं सोनं खरेदी करायचं होतं परंतु आता ते देखील अपूर्ण राहणार का? Gold News
कारण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होत होती. पण आज अचानक सोन्याचे दर कोसळलेले आहेत. बाजारात 10 तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ₹18,600 रुपयांची घसरण झाली. म्हणजेच 24 कॅरेट सोन्याचे एक तोळा दर आज 1,22,290 रुपयांना मिळतंय. तर 22 कॅरेट सोन्याचा दर एक लाख 12 हजार 100 रुपयांवर आलाय. त्यामुळे ज्यांच्या मनात दिवाळीपूर्वी दागिने खरेदी करण्याचा विचार होता त्यांच्यासाठी ही एकदम सोन्याची संधी आहे.

सोन्याचा बाजारात आज सकाळपासूनच घसरणीचा ट्रेंड दिसला. व्यापाऱ्यांनी सांगितलं की, आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलर इंडेक्स आणि दर कमी झाल्यामुळे सोन्याचे भाव कमी झाले. गेल्या काही आठवड्यांपासून 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 1.40 लाखांच्या आसपास होता, पण आज तो 1.22 लाखांवर घसरल्याने सोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे.
22 कॅरेट दागिन्यांच्या सोन्याच्या दरामध्ये देखील चांगली घट झाली आहे. आता एक तोळा 22 कॅरेट सोन 1,12,100 रुपयांपर्यंत खाली आलय. म्हणजे दहा तोळ्यांच्या खरेदीवर तब्बल 17,000 रुपयांचा फायदा मिळणार आहे. तर 18 कॅरेट सोन आता 91,720 रुपयांना मिळतंय. म्हणजेच सोन स्वस्त झालय पण चांदी मात्र महाग झाली.

दरवर्षीप्रमाणे आहे या वर्षी दिवाळीच्या आधी सोन्याच्या भावात अशी घट पाहायला मिळणं ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहे. ग्रामीण भागात, शेतकरी कुटुंबांमध्ये आणि मध्यमवर्गीय घरांमध्ये आजपासूनच सोनं खरेदीच वातावरण तयार झाला आहे.
तर गुड रिटर्न्स वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, गेल्या का आठवड्यात सोन्याचा दर प्रति तोळा जवळपास दोन हजार रुपयांनी खाली आला आहे. ज्यामुळे आजच्या जर भावावर सोन खरेदी करणे हे उत्तम गुंतवणुकीच पाऊल ठरू शकतात.
दिवाळीच्या निमित्ताने सोनं खरेदी करणं शुभ मानल जात. त्यामुळे ज्यांच्या घरात लग्न, साखरपुडा किंवा सणवार अवचित्य आहे, त्यांनी संधी दवडू नये असं सराफ दुकानदारांच सांगणं आहे. कारण सोन्याचा बाजार कधीही पुन्हा वाढू शकतो.

(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे, योग्य दर जाणून घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा.)
