Gharkul Yojana Maharashtra 2025 Apply: मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घरे मंजूर केली होती हे टार्गेट वाढवण्यात आलेले आहे यामध्ये अतिरिक्त 13 लाख घर देण्यात आलेली आहेत.
Gharkul Yojana Maharashtra 2025 Apply
एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रातल्या गरिबांकरिता, कच्च्या घरामध्ये राहणाऱ्यांकरिता एका वर्षात वीस लाख घरे देण्याचे आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेब यांनी केलेली आहे.
हि महाराष्ट्राला केंद्र सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि आतापर्यंत भारताच्या इतिहासामध्ये कुठल्याही राज्याला आजपर्यंत इतकी घर मिळालेली नाहीत , वीस लाख घरे महाराष्ट्राला मिळालेले आहेत, महाराष्ट्राच्या आवास योजनेत एकूण 26 लाख लोकांनी नोंदणी केलेली आहे. व आता हे 20 लाख घरे मिळाल्यामुळे या यादीतील फार कमी लोक बेघर राहतील हे पुढच्या वर्षी आपण त्यांनाही घरकुल देऊ असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माहिती दिली आहे.
याचबरोबर एक अजून महत्त्वाचे माहिती त्यांनी दिली आहे पूर्वी सर्वेक्षणामध्ये जे निकष होते ते निकष देखील आता वगळण्यात आलेले आहेत व खरे गरीब व बेघर लोक आहेत यामध्ये शेतकरी तसेच महिला अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये घेण्यात आले आहे त्यांना पाच वर्ष च्या आत मध्ये घरे देण्यात येतील असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
तर मित्रांनो व शेतकरी बांधवांनो असे महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर झालेली आहेत यामध्ये जर तुम्ही पाहिले तर नवीन घरे 13 लाख 29 हजार 778 व मागील घरी होते 6 लाख 37 हजार 79 म्हणजेच एकूण एका वर्षामध्ये 19 लाख 66 हजार 767 घरे आता मंजूर करण्यात आलेली आहेत.

घरकुल योजना 2025
मित्रांनो या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेची थोडक्यात माहिती आता सांगणार आहे व त्याचबरोबर तुम्हाला योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत हे सुद्धा सांगणार आहे त्याचबरोबर अर्ज कुठे करावयाचा आहे हे पण सांगणार आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेची थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण
ग्रामविकास विभाग:
•प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान
1) ग्रामीण भागात- १,२०,०००/-
2) डोंगरी भागात- १,३०,०००/-
•सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आलेला आहे.
•ग्रामीण भागातील व डोंगरी भागातील अनुदान हे काही दिवसात वाढवण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
EPFO new update 2025: PF खात्याचे 5 महत्त्वाचे बदल
•प्रधानमंत्री आवास योजनेची लाभार्थी निवड प्रक्रिया
सामाजिक, आर्थिक, जात सर्वेक्षण सन २०११ मधून उपलब्ध झालेल्या
प्राधान्यक्रम यादी (Generated Priority List) ची माहिती आवास सॉफ्ट (Awaas Soft) वर उपलब्ध आहे. सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थीची निवड करण्यात येते.
•प्राधान्य क्रम यादी बेघर, १ खोली लाभार्थी, २ खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे. प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी खालील निकषावरील गुणांकनुसार प्रधान्यक्रम देण्यात यावेत.
1) 16 ते 59 अवयव गटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब
2) महिला कुटुंबप्रमुख व 16 ते 59 वयोगटातील रोड व्यक्ती नसलेल्या कुटुंब .
3) 25 वर्षावरील अशिक्षित किंवा निरक्षर व्यक्ती असलेल्या कुटुंब .
4) अपंग व्यक्ती कुटुंब यात शारीरिक दृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही .
5) भूमिहीन कुटुंब ज्यांचे उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे .
6) सदरील गुणांकनाचे आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशाप्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्रधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल.
Gharkul Yojana Maharashtra 2025 Apply
•अर्ज कुठे करावा ?
आवास योजना ग्रामीण भागात याचा अर्ज ऑनलाइन होत नाही याचा अर्ज ग्रामपंचायत आणि पंचायत समिती मध्ये आपले कागदपत्रे घेऊन जायचे आहे.
•घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
1)7/12 उतारा / मालमत्ता नोंदपत्र/ ग्रामपंचायत प्रमाणपत्र , जातीचे प्रमाणपत्र , आधार कार्ड , रेशन कार्ड / निवडणूक ओळखपत्र / विद्युत बिल
2) मनरेगा जॉब कार्ड
3) बँक पासबुक छायांकित प्रत
अशा प्रकारची कागदपत्रे तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये किंवा पंचायत समितीमध्ये जमा करावयाची आहेत.
तसेच मित्रांनो आपल्या सर्वांसाठी महत्वाची बातमी आहे आता आपण प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज ऑनलाईनही करू शकतो तर चला
जाणून घेऊया कसे
Gharkul Yojana Maharashtra 2025 Apply: आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये गुगलवर pmayg.nic असे सर्च करायचे आहे. असे सर्च केल्यावर आपल्यासमोर प्रधानमंत्री आवास योजनेची अधिकृत वेबसाईट येईल या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ऑनलाइन अर्ज करायचा आहे किंवा आपल्या जवळच्या ऑनलाईन सेंटर मध्ये जाऊन आपण प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करू शकता.
येथे करा ऑनलाइन अर्ज 👉🏻: pmayg.nic
