EPFO New Rules 2025 : भविष्य निर्वाह निधी संघटनेने तब्बल सात कोटी पेक्षा जास्त सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. म्हणजेच साध्या भाषेत सांगायचं झालं तर आता सदस्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतून म्हणजे त्यांच्या PF खात्या मधून जमा रकमेतून 100 % पर्यंत पैसे काढण्याची परवानगी दिली गेली आहे. हा निर्णय केंद्रीय न्याय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, या बैठकीचे अध्यक्ष केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडवीया होते. आजच्या या काळात अचानक आपल्याला आर्थिक संकटात सामोरे जाण्यासाठी ही सुविधा फार मोठी गरजेची ठरणार आहे.

याच्या आधी PF खात्यामधून पैसे काढण्यासाठी तब्बल 13 नियम होते. परंतु सामान्य माणसाला हे नियम समजणे अवघड जात होते आणि अर्ज नाकारले जाण्याचा प्रमाण जास्त होतं. पण आता हे नियम सोपे करून फक्त तीन मुख्य श्रेणीमध्ये विभागण्यात आले आहे, आजारपण, शिक्षण आणि लग्न यासारख्या अत्यावश्यक गरजा किंवा घर खरेदी बांधकाम सारख्या निवासी गर्जा आणि काही विशेष परिस्थिती पैसे काढण्याची मर्यादा ही पूर्वीपेक्षा वाढवली आहे. विशेष बाब म्हणजे आता काही परिस्थितीत कारण सांगण्याची गरज नाही त्यामुळे पैसे काढताना जास्त नियमाची गरज नाही.
EPFO ने मुदतपूर्वी पैसे काढण्याचे अटीमध्ये बदल केले आहेत :

याच्या आधी PF पूर्ण सेटलमेंट करण्यासाठी दोन महिने लागायचे पण आता ती मुदत बारा महिने करण्यात आली आहे. त्याचबरोबर अंतिम पेन्शन काढण्यासाठी ची मुदत 36 महीने करण्यात आली आहे, म्हणजेच सदस्यांना त्यांची तात्काळ गरज भागवता येईल आणि निवृत्तीची हक्क सुरक्षित ठेवता येणार आहे.
हे पण वाचा | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुनी पेन्शन योजना पुन्हा होणार लागू, 6 महत्त्वाचे शासन निर्णय
गावाकडील कर्मचारी असो किंवा शहरातील नकोदार वर्ग असो, अचानक येणाऱ्या खर्चाला समोर जाणं प्रत्येकासाठी मोठ्या आव्हान असते. लग्न, मुलीचे शिक्षण, घरचं स्वप्न किंवा आजारपण अशावेळी आपल्या कष्टाने साठवलेल्या पैशावर लगेच हात ठेवता येईल ही खरी सोय आहे. त्यामुळे आता EPFO चा हा निर्णय त्यादृष्टीने माणसाच्या गरजा लक्षात घेऊन घेतलेला आहे या निर्णयामुळे अनेक कर्मचारी आनंदित आहेत.

आजचे याबद्दलच्या काळात सुरक्षित बचत जितकी महत्त्वाची आहे तितकीच गरज पडल्यावर आपले पैसे सहज मिळणे ही महत्त्वाचा आहे. आणि या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना आपल्या PF खात्यातून अगदी सहजपणे पैसे काढता येणार आहेत आणि आपल्याला गरज लागेल तिथे ते वापरता येणार आहेत.
हे पण वाचा | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुनी पेन्शन योजना पुन्हा होणार लागू, 6 महत्त्वाचे शासन निर्णय

1 thought on “EPFO New Rules 2025 | कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गिफ्ट ,आता PF मधून 100% पैसे काढता येणार जाणून घ्या नवीन नियम?”