MPSC Group C Exam 2025 | नमस्कार मित्रांनो, लोकसेवा आयोगाकडून राज्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारी नोकरीत स्वप्न पाहणाऱ्या हजारो मुला-मुलींसाठी एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे MPSC कडून महाराष्ट्र गट–क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या भरती करिता तब्बल 938 जागा भरल्या जाणार आहेत.
या भरतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
या पदांमध्ये उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक घ्या पदांचा समावेश असणार आहे. त्यात उद्योग निरीक्षक पदाच्या 9 जागा, तांत्रिक सहाय्यक पदाच्या 4 जागा, कर साहेब पदाच्या 73 जागा तर लिपिक संकलित पदाच्या तब्बल 852 जागा असणार आहेत. म्हणजेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाले आहेत.
कधी होणार परीक्षा ?

या भरतीची संयुक्त पूर्व परीक्षा ही 4 जानेवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा होणार आहे विशेष म्हणजे लिपिक टंकलेखक आणि कर्साहित पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणेदेखील बंधनकारक असणार आहे.
अर्ज परीक्षा आणि अंतिम तारीख ?
या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 7 ऑक्टोबर 2025 दुपारी एक वाजता सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदती 27 ऑक्टोबर रात्री 11.59 पर्यंत असणार आहे, ऑनलाइन शुल्क देखील त्याच दिवशीपर्यंत भरता येणार आहे . मात्र SBI बँकेच्या शाखेतील चलनाद्वारे शुल्क भरण्याची असले तर ते तुम्हाला 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत भारता येणार आहे.
पात्रता काय असणार ?

उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे, उद्योग निरीक्षक पदासाठी अभियांत्रिक / तंत्रज्ञानातील पदविका किंवा विज्ञान शाखेतील पदवी आवश्यक आहे. इतर सर्व पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा शासनमान्य समतुल्य पात्रता असणे आवश्यक आहे.
परीक्षा पॅटर्न :
पूर्व परीक्षा ही 100 गुणाची तर मुख्य परीक्षा 400 गुणांची असणार आहे त्यानंतर पदानुसार कौशल्य चाचणी घेतली जाईल.
परीक्षा शुल्क किती असणार आहे :
खुल्या प्रवर्गासाठी अर्धशुल्क 394 रुपये , मागासवर्गीय/ EWS/ अनाथ प्रवर्गासाठी 294 तर माजी सैनिकांसाठी फक्त 44 रुपये असणार आहे. मुख्य परीक्षेसाठी हे शुल्क अनुक्रमे 544 रुपये 344 रुपये असणार आहे.

मित्रांनो सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न प्रत्येक तरुणाच असतं, गावाकडे तरुण असो किंवा शहरांमध्ये अभ्यास करणारे तरुण असो प्रत्येकांना आपल्याला एक सरकारी नोकरी मिळावी अशी स्वप्न असते. घराची परिस्थिती कशीही असली तरी मेहनतीवर विश्वास ठेवून ही संधी चुकवू नका. आता वेळ तुमच्या हातात आहे आजपासून तयारीला लागा या भरतीमध्ये 938 जागा असणार आहेत अनेकांचे आयुष्याला नवी दिशा देणारी ही भरती राहणार आहे.
