Bank New Rules November | येत्या एक नोव्हेंबर पासून तुमच्या खिशावरती आणखी अतिरिक्त ताण पडणार आहे. कारण जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत असाल तर बँकेने याबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत यामुळे आता बँकिंग सेवा वापरणाऱ्यांसाठी हे नवीन नियम लागू होणार आहेत. कोणत्या आहेत हे नवीन नियम जाणून घेऊया, याचा फटका सामान्य ग्राहकांना बसणार का? त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा. Bank New Rules November
हे पण वाचा | सिबिल स्कोर खराब आहे ? पण पैशाची गरज आहे आता या मार्गाने मिळू शकता सहज कर्ज
सरकारी आणि खाजगी बँकांनी ऑनलाईन बँकिंग सेवा वापरणाऱ्यांसाठी काही महत्त्वाचे नियम लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. या नव्या नियमांमुळे लाखो ग्राहकांना थेट फटका बसणार असून, बँकिंग सेवा वापर न आता आणखी महाग होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बँकांनी जवळपास प्रत्येक छोट्या सेवेसाठी शुल्क लावायला सुरू केली होती. पण आता तर ऑनलाईन व्यवहार, मोबाईल ॲप द्वारे पेमेंट, वॉलेटमध्ये पैसे टाकने सगळं महाग होणार आहे. SBI, एचडीएफसी काही मोठ्या बँकेने आपापल्या फी स्ट्रक्चर मध्ये बदल जाहीर केले आहेत.

SBI चे नवीन नियम काय :
एसबीआयन क्रेडिट कार्ड साठी नवीन अट जाहीर केले आहेत. आता रिवार्ड पॉईंट्सन वस्तू खरेदी केली, व्हावचर घेतलं तरी थेट 99 रुपयांचा शुल्क द्यावा लागेल. तसेच वीज, फोन किंवा गॅस बिलासाठी 50,000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट केले तर एक टक्के अतिरिक्त शुल्क भरावा लागेल. कॉलेज किंवा शाळेची फी जर तुम्ही थर्ड पार्टी ॲप मधून भरली, तर त्यावरही 1% चार्ज लागणार. मात्र शाळेत थेट भरल्यास शुल्क लागणार नाही.
HDFC बँकेचा नवा झटका

एचडीएफसी ने रात्री 11 ते सकाळी सात वाजे दरम्यान कॅश रिसायकलर मशीन मध्ये पैस जमा करणाऱ्यांसाठी नवा नियम आणला आहे. या वेळेत जमा केल्या प्रत्येक व्यवहारावर 50 रुपये अतिरिक्त शुल्क आकारला जाणार आहे. हा नियम एक नोव्हेंबर पासून लागू होणार असून, याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच बसणार आहे.
इतर सेवा शुल्क :

डुप्लिकेट पासबुक साठी शंभर रुपये, इंट्री सह पासबुक साठी पन्नास रुपये प्रति पेज, चेक थांबवण्यासाठी दोनशे रुपये, चेक परतल्यास 150 रुपये, स्वाक्षरी पडताळणीसाठी शंभर रुपये, डिमांड ड्राफ्ट 75 रुपये, पोर्टल चार्ज 50 ते 100 रुपये, पाच यानंतर रोख रक्कम काढल्यास प्रत्येक वेळी 75 रुपये, खाते देख भाल शुल्क पाचशे रुपये, SMS अलर्ट दहा ते 35 रुपये तिमाही, मोबाईल नंबर बदली करण्यासाठी पन्नास रुपये, जीएसटी आणि डेबिट कार्ड रिपीन बदलण्यासाठी पंचवीस ते पन्नास रुपये इतका दर ठरवण्यात आले आहेत. नक्की सर्वसामान्यांना आता यापुढे व्यवहारासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहेत.
हे पण वाचा | सिबिल स्कोर खराब आहे ? पण पैशाची गरज आहे आता या मार्गाने मिळू शकता सहज कर्ज
( Disclaimer: वरील दिलेली माहिती काही महत्त्वाच्या प्रसार माध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही योग्य माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.)
