Ladki Bahin Yojana September Installment | राज्यातील लाडक्या बहिणीसाठी आजचा दिवस आनंदाचा राहणार आहे. याच एक मुख्य कारण म्हणजे स्वतः मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी खुशखबर दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज पासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.
हे पण वाचा | E kyc केली नाही तर मिळणार नाही दिवाळीचा हप्ता ! आता या प्रकारे करा लाडकी बहीण योजनेची kyc
म्हणजेच महिलांसाठी दिवाळीची ही एक प्रकारे गोड बातमी ठरली आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतःच्या ट्विटर सोशल मीडिया अकाउंटद्वारे सांगितले की राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून या योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर हा निधी पोहोचविला जाणार आहे.

राज्य सरकारकडून सप्टेंबर महिन्याच्या आत्यासाठी तब्बल 410.30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी विशेषता अनुसूचित जाती घटकातील पात्र महिलांसाठी असेल, मात्र सामाजिक न्याय विभाग अंतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ आणि राज्य निवृत्त वेतन योजना लाभार्थी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही अशी अधिकृत माहिती देखील समोर आली आहे.
महिलांनी लवकरात लवकर आपली KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी !
राज्य शासनाने पात्र लाभार्थी महिलांसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाईट KYc करण्यासाठी दिलेली आहे. या संकेतस्थळावर केवायसी सुविधा सुरू करण्यात आली असून पुढील दोन महिन्यात सर्व लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करांनी अत्यंत आवश्यक आहे. अनेक महिलांना पोर्टलवर तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे तरी सरकारकडून निधी वितरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे.
ग्रामीण भागातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद येणार आहे. आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने महिलांसाठी निधीची तरतूद केली ही बाब कौतुकास्पद आहे. दिवाळीपूर्वीच पंधराशे रुपये खात्यात येणार आहेत त्यामुळे अनेक महिलांना आता दिवाळीसाठी आर्थिक मदत होणार आहे. एकीकडे वाढत्या महागाईने महिलांना कोंडमारा झाला असताना सरकारचा हा हप्ता त्यांच्या संसाराला थोडा दिलासा देणारा ठरणार आहे.

लाडकी बहीण योजना ही फक्त एक योजना नाही तर महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या संविमानाचा प्रतीक बनलेली आहे. आज या योजनेमुळे घरात महिलांचा आत्मविश्वास वाढतोय आणि त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ लागले आहे दिवाळीचा सण जवळ आला असताना या 1500 रुपयांच्या रकमेमुळे अनेक घरातील महिलांच्या चेहऱ्यावरती हास्य आले आहे.
हे पण वाचा | E kyc केली नाही तर मिळणार नाही दिवाळीचा हप्ता ! आता या प्रकारे करा लाडकी बहीण योजनेची kyc
