NSC Interest Rate 2025 : पोस्ट ऑफिस हा आपल्या देशातील सर्वसामान्य नागरिकांचा विश्वासू साथीदार आहे. खेड्यात असो किंवा शहरांमध्ये पोस्ट ऑफिसच्या योजना नेहमी लोकांसाठी सुरक्षितेचे हमी आणि बचतीची सोय . महिला असो किंवा शेतकरी, विद्यार्थ्यांना देखील प्रत्येक काही ना काही योजना सुरू असतात. त्यामुळे नागरिक नियमितपणे अशा योजनेच्या शोधामध्ये राहतात, जय योजना सुरक्षित असतात आणि चांगला परतावा मिळून देतात त्यातच आता पुन्हा एक पोस्ट ऑफिस ची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना म्हणजेच NSC खूप मोठ्या चर्चेमध्ये आली आहे.
आजच्या घडीला महागाई खूप जास्त वाढली आहे, बचत करण्याचे पर्याय कमी पडत आहेत आणि गुंतवणुकीसाठी सुरक्षित ठिकाण शोधणे लोकांसाठी खूप कठीण झाली आहे. शेअर मार्केटमध्ये जोखीम आहे, तर म्युचल फंड सर्वसामान्य नागरिकाला समजत नाही. आणि खाजगी स्कीमवर विश्वास ठेवणं सध्या खूप अवघड आहे कोणी कधी धोका देईल सांगता येत नाही. आता अशावेळी पोस्ट ऑफिस सारख्या सरकारी संस्थेची योजना हेच सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठे आधारस्थान ठरत आहे . NSC ही त्यापैकी एक दीर्घकालीन आणि हमखास फायदा देणारी योजना आहे.

या योजनेची मुदत पाच वर्षे असते, पाच वर्षे म्हणजे फार मोठा काळ नाही आणि त्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर तुमच्यासाठी NSC हा सर्वात भारी पर्याय राहणार आहे. कारण या योजनेवर सरकार वेळोवेळी व्याजदर निश्चित करते आणि ते वार्षिक चक्रवाढ पद्धतीने दिले जाते, महत्वाची बाब म्हणजे व्याजदर हा गुंतवणुकीच्या काळात जोडला जातो परंतु प्रत्यक्ष रक्कम मुदत पूर्ण झाल्यावर गुंतवणूकदाराला हस्तगत होते.
पुन्हा गुंतवणूक हा देखील एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे, पाच वर्षानंतर मिळणाऱ्या व्याजाची पुन्हा गुंतवणूक करता येते तसेच योजनेत गुंतवलेले रक्कम दाखवून कर्ज घेणेदेखील सोपे होते. म्हणजेच अकस्मिक आर्थिक गरज पडल्यास ही योजना आधार देते.

हातावर काढण्याची प्रक्रिया देखील अत्यंत सोपी आहे गावातला शेतकरी असो किंवा शहरांमध्ये नोकरदार कर्मचारी, ही सर्वसामान्य नागरिक कुणी तुमच्याजवळ पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघडू शकतो. आज-काल ऑनलाईन ऑनलाइन स्वयं उपलब्ध झाली आहे, सरकारी योजना असल्यामुळे त्यात फसवणुकीचा प्रश्न राहत नाही आणि गुंतवणुकीवर केंद्र सरकारची नजर असते.
तुम्ही या योजनेमध्ये कमीत कमी 1000 रुपये पासून तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता. आणि त्यावर 10च्या पटीने कितीही रक्कम गुंतवता येते. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास कोणती मर्यादा नाही, म्हणजेच आता लहान गुंतवणूकदार आणि मोठ्या गुंतवणूकदार या प्रकारच्या दोन्ही गुंतवणूकदार या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.
किती मिळणार नफा ?
आता सर्वांना एक प्रश्न पडतो योजनेमध्ये गुंतवणूक केली परंतु नफा किती मिळणार ? तर या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उदाहरणार्थ जर एखाद्या गुंतवणूकदाराचे 4 लाख रुपये या योजनेत गुंतवले तर पाच वर्षाच्या कालावधीनंतर त्याला साधारणपणे , ₹ 5,79,613,52 रुपये मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला तब्बल 1,79,613 रुपयांचा निवळण फार मिळणार आहे. एवढ्या कमी काळात आणि जोखीम शिवाय इतका परतावा तुम्हाला दुसऱ्या कोणत्या योजनेमध्ये मिळणार नाही.
ग्रामीण भागातला एखादा शेतकरी, असो किंवा शहरातील नोकरदार वर्ग कोणीही आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी मुलीच्या लग्नासाठी किंवा भविष्याच्या सुरक्षेसाठी ही योजना निवडू शकतो. कारण पैशावर आम्ही परताव्यावर विश्वास आणि गरज पडल्यास कर्जाची सोय देखील उपलब्ध असणार आहे.

पैसे कमवून अवघड आहे पण त्याचं योग्य नियोजन करणे त्याहून कठीण आहे . सरकारी हमीची आणि चांगल्या परताव्याची योजना जर हवी असेल तर पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र हा पर्याय नक्कीच तुम्हाला फायदेशीर राहणार आहे. कारण की सोन शेअर मार्केट जमीन या गोष्टींमध्ये चल उतार नेहमी असतो सरकारच्या योजनेमध्ये स्थिरता आणि विश्वास दोन्ही असतात.
Disclaimer:
या लेखांमध्ये दिलेली माहिती राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) उजनी बाबत उपलब्ध शासकीय स्वतावर आधारित आहे. व्याजदर नियम आणि अटी यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहितीची पडताळणी करावी.

2 thoughts on “पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना ! 4 लाखाच्या ठेवीवर पाच वर्षानंतर मिळणार मोठा नफा ”