Post Office Yojana: प्रत्येक जणाला आपल्या मेहनतीचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक त्यावर चांगला परतावा मिळवण्याची अपेक्षा असते. आयुष्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे कष्टाने कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणे. आजकाल शेअर बाजारात म्युचल फंड मध्ये डिजिटल गोल्ड अशा अनेक पर्यायांमध्ये गुंतवणुकीच्या चर्चा होत आहेत. मात्र ग्रामीण भागात मध्यमवर्गीय कुटुंबात आणि सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये अजूनही पोस्ट ऑफिसच्या योजनांवर मोठा विश्वास आहे. कारण पोस्ट ऑफिसच्या या योजना पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि सरकारी संरक्षणाखाली चालवल्या जातात. तुम्ही देखील सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

पोस्ट ऑफिसच्या अनेक लोकप्रिय योजनांपैकी एक म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना (NSC). या योजनेमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतः गुंतवणूक केली आहे. त्यांच्या नावाने सुमारे 9.12 लाख रुपयांची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच देशाचे प्रधानमंत्री जर या योजनेवर विश्वास ठेवत आहेत तर सामान्य गुंतवणूकदरासाठी ही योजना कितीपत सुरक्षित आहे याचा अंदाज आपण घेऊ शकतो. या योजनेमध्ये तुम्ही गुंतवलेली तुमची पूर्ण रक्कम सुरक्षित असून चांगला परतावा देखील मिळतो.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना म्हणजे नेमकं काय?

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना म्हणजे पोस्ट ऑफिस ची अशी गुंतवणूक योजना ज्यामध्ये तुम्ही एकदाच पैसे गुंतवून ठराविक कालावधीनंतर मोठे भांडवल उभा करू शकता. या योजनेचा प्रामुख्याने कालावधी पाच वर्षाचा असतो. आजच्या घडीला या योजनेत वार्षिक 7.7 टक्के व्याजदर दिला जातो. म्हणजेच जर तुम्ही या योजनेमध्ये आज पैसे गुंतवले तर पाच वर्षांनी तुम्हाला ठराविक परतावा मिळणारच, म्हणजे या योजनेत पैसे बुडण्याची भीती नाही.
किती पैसे गुंतवू शकता?
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे, तुम्ही कमीत कमी 1000 रुपया पासून गुंतवणूक सुरू करू शकता. म्हणजेच तुमच्याकडे मोठी रक्कम असावी असे काही नाही. तुम्ही तुमचा दैनिक घर खर्च भागवून छोटे-छोटे वाचवलेले पैसे देखील या योजनेत गुंतवू शकतात. यात गुंतवलेले थोडे थोडे पैसे भविष्यात सुरक्षित रक्कम तयार करू शकते. या योजनेत आणखीन एक मोठा फायदा मिळतो, तो म्हणजे कर सवलत. आयकर कायद्यातील कलम 80 C अंतर्गत तुम्ही गुंतवणुकीवर 1.5 लाख रुपयापर्यंत कर सवलत मिळू शकता. त्यामुळे बचत आणि गुंतवणूक या सोबतच करात देखील फायदा मिळतो.
कसा मिळतो चांगला फायदा?
या योजनेअंतर्गत कसा फायदा मिळतो याबद्दल उदाहरणासह समजून घेऊ. समजा एखाद्या व्यक्तीने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली. तर पाच वर्षांनी मॅच्युरिटी झाल्यावर त्या व्यक्तीला एकूण 7 लाख 24 हजार 517 रुपये मिळतील. म्हणजेच मूळ गुंतवणुकीवर तब्बल 2 लाख 24 हजार 517 रुपयांचा नफा मिळेल. अशाप्रकारे तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकता. या प्रमाणपत्राचा उपयोग तुम्ही बँकेतून कर्ज घेण्यासाठी देखील करू शकता. म्हणजेच अचानक पैशाची गरज भासल्यास ही गुंतवणूक न मोडता तुम्ही बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज काढू शकता.

आज-काल शेअर बाजारात अनेक प्रकारच्या फसवणुकी होतात. त्याचबरोबर शहर अचानक घसरल्यामुळे मोठा तोटा सहन करावा लागतो. अनेक प्रायव्हेट कंपन्या अचानक बंद पडतात. पण अशावेळी पोस्ट ऑफिसच्या योजना सरकारी हमी सह जबरदस्त परतावा मिळवून देतात. त्यामुळे यात गुंतवलेले पैसे कुठेही बुडण्याची भीती निर्माण होत नाही. यामुळे ग्रामीण भागात अजूनही पोस्ट ऑफिसला प्राधान्य दिले जाते. पोस्ट ऑफिसच्या योजनेवर नागरिकांचा मोठा विश्वास बसलेला आहे.
आपल्या हातात रोज पैसे येतात मात्र दैनंदिन खर्च जास्त असल्यामुळे खर्चून देखील जातात. पण यातून थोडीफार रक्कम वाचून भविष्यासाठी सुरक्षित कुठेतरी गुंतवली तर मोठा आधार मिळतो. भविष्यात कोणती आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल सांगता येत नाही त्यामुळे तुमच्याकडे गुंतवणूक केलेले किंवा सुरक्षित ठेवलेली रक्कम असणे आवश्यक आहे. अशावेळी तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये केलेली गुंतवणूक कामे येऊ शकते. तुम्ही देखील गुंतवणुकीचा विचार करत असाल तर लगेच पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करा. गुंतवणूक करण्यासाठी जवळील पोस्ट ऑफिस मध्ये भेट द्या.

(Disclaimer: वरील माहिती ही एखाद्या योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी दिलेली आहे. गुंतवणुकीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही आर्थिक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्यावा. कारण व्याजदर कालांतराने बदलू शकतो.)
