WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2,000 रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मागील काही महिन्यापासून सातव्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज 2000 रुपये जमा होणार आहेत. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा संपली आहे. राज्यातील तब्बल 92 लाख 91 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा होणार आहे. याबाबत कृषी विभागाने स्पष्ट माहिती दिली आहे.Namo Shetkari Yojana

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाडीबीटी द्वारे या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने तब्बल 1 हजार 932 कोटी 72 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अगदी काहीच वेळात राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचा आर्थिक लाभ जमा केला जाणार आहे.

सातव्या हप्त्यासाठी विलंब का झाला?

नमो शेतकरी योजनेअंतर्गत सातवा हप्ता एप्रिल ते जुलै या कालावधीत जमा होणार होता. मात्र राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे या हप्त्यासाठी एक महिना विलंब झाला आहे. प्रत्यक्षात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता एक महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. त्या आपल्या सोबतच सातव्या हप्त्याच्या लाभ देखील शेतकऱ्यांना मिळणार होता. मात्र काही तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांना तब्बल एक महिनाभर अतिरिक्त वाट पाहावी लागली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी वर्तवली जात आहे.

हे पण वाचा : CT scan आणि MRI  यामधील फरक काय ? जाणून घ्या आज डॉक्टर काय सल्ला देतात 

शेतकऱ्यांना शेती पिकवत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये वाढती महागाई, नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला हमीभाव न मिळणे, अशा अनेक मोठ्या समस्या आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकल्यानंतर देखील परवडत नाही. अशावेळी शेती उत्पन्न मिळवण्यासाठी केलेला खर्च देखील मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकार अंतर्गत पी एम किसान योजनेअंतर्गत वार्षिक 6000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारांतर्गत नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते. या दोन्ही योजनेचे मिळून शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळतो.

या दोन्ही योजनेचे पैसे दर चार महिन्याच्या अंतरानंतर दोन हजार रुपये याप्रमाणे वार्षिक तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत वीस हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत तर नमो शेतकरी महा सन्मान योजनेअंतर्गत सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आज सातव्या हाताचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. तुम्ही देखील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे.

आजचा दिवस आर्थिक दृष्ट्या दुर्बळ बनलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे. एक महिन्याच्या विलंबानंतर अखेर शेतकऱ्यांना या योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहेत. सरकारने शेतकऱ्यांसाठी किंवा गोरगरीब नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत मात्र या योजनेचा योग्य वेळी शेतकऱ्यांना मिळणे हेच खरे शेतकऱ्यांसाठी समाधान मानलं जात आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मिळणारा प्रत्येक रुपया हा त्यांच्या घामाचा एक थेंबच आहे. सरकारच्या या आर्थिक आधारामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या काही प्रमाणात प्रबळ बनतो. त्यामुळे या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ नक्कीच शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे.

तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का नाही कसे तपासावे?

नमो शेतकरी योजनेअंतर्गत दोन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का नाही हे कसे तपासावे? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. अशावेळी तुम्ही खालील दिलेल्या स्टेप फॉलो करून जाणून घेऊ शकता तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का नाही?

  • सर्वप्रथम तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर इथे beneficiary list या पर्यायावर क्लिक करून लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का नाही ये तपासावे लागेल.
  • जर तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा लाभ जमा होऊन.
  • त्याशिवाय तुम्ही ऑफलाइन पद्धतीने तुमच्या बँकेत जाऊन तुमच्या पासबुक वर एन्ट्री करून खात्यात पैसे जमा झाले का नाही याची खात्री करू शकता.
  • जर तुम्ही नेट बँकिंग वापरत असाल तर त्यावर लॉगिन करून देखील तुमच्या खात्यात 2000 आले आहेत का नाही तपासू शकता.

हे पण वाचा | प्रधानमंत्री मोदीच्या वाढदिवसानिमित्त खास मोहीम ! महिलांना होणार मोठा फायदा 

1 thought on “Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2,000 रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार?”

Leave a Comment

error: Content is protected !!