WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 इंजीनियरिंग तरुणांसाठी सुवर्णसंधी ! PGCIL कडून मोठी बंपर भरती, पगार 1.20 लाख रुपये पर्यंत 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PGCIL Recruitment 2025 : सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या इंजिनिअरिंग तरुणांसाठी एक मोठी संधी निघून आली आहे. पावर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे, या कंपनीने फिल्ड इंजीनियरिंग आणि फीड सुपरवायझर या दोन्ही महत्त्वाच्या पदांकरिता एकूण 1543 जागा उपलब्ध करून दिले आहेत.  या संधीचा फायदा अभियांत्रिकी म्हणजेच इंजीनियरिंग शिक्षण घेत असलेल्या तरुणांसाठी होणार आहे. PGCIL Recruitment 2025

या भरतीला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

इंजीनियरिंग झालेल्या तरुणांचे एक स्वप्न असतं एक नोकरी आणि एक चांगला पगार, आता या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी ही भरती निघून आली आहे. या भरती करिता इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 सप्टेंबर 2025 ठेवण्यात आली आहे, देशभरातील कोणताही तरुण या भरतीमध्ये अर्ज करू शकतो अर्ज प्रक्रिया ही सोपी आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावा अर्ज भरण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा .

शैक्षणिक पात्रता 

या भरतीला अर्ज करण्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, फीड इंजिनिअर आणि फीड सुपरवायझर पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून B.E , बी टेक , किंवा बीएससी इंजीनियरिंग ही पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय किमान 55% गुणासह उत्तीर्ण होणे देखील बंधनकारक आहे, आणखीन काही विशेष पात्रतेची निकष तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही यासाठी अधिकृत जाहिरात पहावी. 

PGCIL Recruitment 2025
PGCIL Recruitment 2025

या पदाकरिता किती मिळणार पगार  : 

जर तुम्ही या भरतीमध्ये सिलेक्ट झाला तर तुम्हाला पगार किती मिळणार, तुम्ही कोणतीही नोकरी करता पण तुम्हाला यामध्ये पगार किती आहे हा प्रश्न सगळ्याला पडतो तर पहा या पदाकरिता किती मिळणार पगार ? 

  • फील्ड इंजिनीयर : प्रत्येक महिना 30,000  ते 1,20,000 रुपये 
  • फील्ड सुपरवायझर : दरमहा 23,000 ते  1,05,000 रूपये 

वयोमर्यादा : 

या भरतीसाठी उमेदवाराचे वय  कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 29 वर्ष असले पाहिजे. व यानंतर सरकारी नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाणार आहे. 

  • अनुसूचित जाती जमाती –  5 वर्ष सूट 
  • इतर मागासवर्गीय – 3 वर्षे सुट 
  • दिव्यांग उमेदवारांसाठी – 10 वर्ष सूट 

परीक्षेचे स्वरूप 

  • ही परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्ते वर आधारित असणार आहे उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. 
  • या परीक्षांमध्ये प्रत्येकी बरोबर उत्तरासाठी एक गुण असणार आहे 

 सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे म्हणजेच चुकीच्या उत्तरासाठी तुमचा बरोबर असणारा उत्तर वजा केला जाणार नाही. यामुळे उमेदवारांना ही एक महत्वपूर्ण संधी निर्माण झालेली आहे उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्यावा. 

कोणत्या विषयावर आधारित असणे परीक्षा : 

या पदाकरिता तुम्हाला खालील दिलेल्या विषयावर प्रश्न विचारण्यात येणार आहेत. 

  • टेक्निकल 
  • इंग्रजी भाषा 
  • बुद्धिमत्ता 
  • परिमाणात्मक अभिरुची
  • सामान्य विज्ञान 

अर्ज प्रक्रिया ? 

  • या भरतीला अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम PGCIL च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. 
  • या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला Field Engineer/Supervisor Recruitment 2025’ या पर्यायावरती क्लिक करावे लागणार आहे.
  • यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक माहिती ही भरायची आहे. 
  • यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे आहे. 
  • अर्जशुल्क भरल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे 
  • यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची प्रिंट आउट काढून घ्यायची आहे. 

आजच्या या स्पर्धा परीक्षेच्या जागांमध्ये अनेक तरुण नोकरीच्या शोधामध्ये आहेत, व यानंतरच इंजीनियरिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण योग्य नोकरी मिळवणं हे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे. अशातच आता तुमच्यासाठी PGCIL एक मोठी भरती घेऊन आली आहे ही कंपनी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे आणि या कंपनीमध्ये नोकरी मिळवणे हे अनेकांची स्वप्न आहे. 

 तर तुम्ही देखील एक चांगली नोकरीच्या शोधामध्ये आहे तर, 17 सप्टेंबर 2025  आधी या भरती करिता अर्ज करून घ्यावा. ही संधी अनेकांना मिळत नाही या संधीचे सोने करणे आता तुमच्यावर आहे तुम्ही वर दिलेल्या विषयानुसार जर अभ्यास केला आणि या भरतीसाठी पात्र असाल तर तुम्ही देखील या भरतीमध्ये सिलेक्ट होऊ शकता. 

Disclaimer ;  आम्ही या लेखांमध्ये दिलेली माहिती ही विविध वृत्त पत्र,  आधाराहून घेतलेली आहे.  तरी भरती प्रक्रियेतील नियम अटी आणि पात्रता निकष यामध्ये कंपनीकडून वेगवेगळ्या बदल करण्यात येऊ शकते त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पावर ग्रिड कारपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन संपूर्ण नोटिफिकेशन वाचून घ्यावी. 

Leave a Comment

error: Content is protected !!