IMD Weather Alert : देशभरात यंदा पावसानं अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी तर पावसाने सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना घराबाहेर काढले आहे त्यांची शेती आणि घर याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात तर अनेक गावाला पुराने घेरलं पिक वाहून गेली घरे उध्वस्त झाली आणि अनेकांचे संसार पाण्याखाली गेली. खरीप हंगाम पिके हातातून गेल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान झाली आहे . आता वातावरणामध्ये पुन्हा बदल होतोय पाऊस कमी झालाय असं वाटत असताना पुन्हा एकदा हवामान विभागाने इशारा दिला आहे.
हवामान विभागाचा नवीन अंदाज :
भारतीय हवामान विभागानुसार दक्षिण श्रीलंका आणि पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये पुन्हा Cyclonic Circulation तयार झाला आहे. त्यामुळे हवामानातील बदल झाले आहेत, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो आता पश्चिम उत्तर दिशेकडे सरकत आहे त्यामुळे देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कुठे आणि किती पडणार पाऊस :
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 15 ते 19 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू आणि केरळमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात अति मुसळधार पावसाचा इशारा वर्तुळात आला आहे पुढील दोन ते तीन दिवस आंध्र प्रदेश, लक्षदीप आणि अंदमान निकोबार बेटावर मुसलदार पावसाची शक्यता आहे.
16 आणि 17 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश मध्ये विजेच्या कडकडासह आणि वादळाचं मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग प्रति तास 50 किमी पर्यंत जाऊ शकतो त्यामुळे हवामान विभागांना अलर्ट जरी केला आहे.
महाराष्ट्रात काय असणार परिस्थिती ?
दक्षिण भारतात पावसाचा धोका असतानाच महाराष्ट्रात आता थंडीचा जोर वाढला आहे. पुढील काही दिवसांमध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात थंडीची लाट सुरू होणार आहे. मराठवाड्यात तर थंडीचा कडकडात जाणवणार आहे असं हवामान विभागाने स्पष्ट सांगितले आहे. यामध्ये चांगली बाब म्हणजे महाराष्ट्रात पावसाचा कोणता इशारा नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही.
