1 November New Rules | आज पासून नंबर महिना सुरू झाला आहे, आणि त्यांच्यासोबत अनेक आर्थिक नियमांमध्ये मोठे बदल लागू झाले आहेत. बँक खाते, क्रेडिट कार्ड, पेन्शन पासून आधार कार्ड पर्यंत या सगळ्या गोष्टी आता नव्या पद्धतीने चालणार आहेत. त्यामुळे हे नियम प्रत्येक सामान्य माणसासाठी जाणून घेणे गरजेचे आहे, सरकार आणि रिझर्व बँकेने केलेल्या या बदलांचा परिणाम थेट तुमच्या पैशावर, खात्यावर आणि व्यवहारावर होणार आहे. 1 November New Rules
हे पण वाचा| दिवाळीनंतर सरकारचा मोठा निर्णय! दोन बायका असतील तर पेन्शन कशी वाटली जाणार? जाणून घ्या नवा नियम!
सगळ्यात आधी पाहूया बँक खात्याशी संबंधित मोठा बदल :
आतापर्यंत ग्राहकांना त्यांच्या खात्यात फक्त एकच नॉमिनी जोडण्याची परवानगी बँकेने दिली होती. परंतु आता ग्राहकांना त्यांच्या खात्यात नवीन नियमानुसार चार नॉमिनीपर्यंत जोडता येणार आहे. म्हणजेच जर एखाद्या दुर्दैवी घटनेनंतर पैसे कुणाकडे जाणार हे आधीच ठरवता येईल त्याचबरोबर बँक लवकर साठी सुद्धा ही क्रमांकावर सुविधा उपलब्ध होणार आहे ग्रामीण भागात तिथे एकच कुटुंबातील अनेक मंडळी एकाच खात्यावर अवलंबून असतात त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.

SBI क्रेडिट कार्ड नवीन नियम :
जर तुम्ही आता शाळा किंवा कॉलेजची फी थर्ड पार्टी ॲपद्वारे उतरानार्थ फोन पे पेटीएम याद्वारे भरत ली तर तुम्हाला एक टक्का अतिरिक्त चार द्यावे लागेल. पण जर तुम्ही तीच फी बँकेचे अधिकृत वेबसाईटवरून किंवा POS मशीनद्वारे भरली तर कोणताही चार्ज लागणार नाही काही ठिकाणी जास्त वॉलेट टॉप-अप केल्यास एक टक्का शुल्क लागू शकतो. म्हणजेच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आता व्यवहार करताना जरा जपून करावा लागणार आहे.
युनिफाईड पेन्शन स्कीम :
केंद्र सरकारने या योजनेत सहभागी होण्यासाठीची अंतिम मुदत वाढवली आहे. आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे याआधीही मुदत 30 सप्टेंबर होती. म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीची तयारी करणाऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

पेन्शन धारकांसाठी नवीन नियम |
केंद्र आणि राज्य सरकारच्या पेन्शनधारकांना आता जीवन प्रमाणपत्र जमा करावा लागणार आहे. हे प्रमाणपत्र तुम्ही जीवन प्रमाण पोर्टल , बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सबमिट करू शकतात. हे काम उशीर न करता लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे हे काम पूर्ण केले नाही तर पेन्शन थांबण्याची शक्यता आहे.

आधार कार्ड पॅन कार्ड लिंकिंग :
सरकारनं आधार पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत वाढून 31 डिसेंबर 25 केले आहे. हा छोटा वाटणारा पण मोठा निर्णय आहे कारण जर हे लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकतो आणि त्यामुळे तुमची आर्थिक व्यवहारावर अडचण येऊ शकते.
हे पण वाचा| लाडकी बहिण योजनेमध्ये नवा मोठा बदल! आता लाभ घ्यायचा असेल तर E– kyc करावी लागणार आहे

1 thought on “१ नोव्हेंबरपासून लागू झाले ५ नवीन नियम! बँक, पेन्शन आणि आधार कार्डच्या बदलांचा तुमच्या खिशावर थेट परिणाम”