WhatsApp Aadhaar download : सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत, परंतु सर्वसामान्य नागरिकापर्यंत या सुविधा पोहोचल्या नाहीत किंवा त्यांना या सुविधाबद्दल माहिती नाही. आज आपण कुठे गेलो तर आपल्याला पहिल्यांदी आधार कार्ड या डॉक्युमेंट ची गरज लागते, तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले किंवा कुठल्याही ठिकाणी तुम्हाला सर्वात आधी आधार कार्ड मागितले जाते. अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर मग काय करावे ? तुम्ही मग त्या ठिकाणी फोटो मागवता किंवा इतर कोणते गोष्टी करता परंतु जर तुमच्या मोबाईलवरून फक्त एक Hi पाठवल्यावर तुम्हाला तुमचे आधार कार्ड एका मिनिटात मिळणार आहे. WhatsApp Aadhaar download
सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी सरकारने आणखीन एक मोठे पाऊल उचलले आहे. बँकेचे व्यवहार असो किंवा कोणतेही सरकार योजनेचा लाभ घेणे असो व सिम कार्ड अशा अनेक गोष्टींना आता आधार कार्ड कंपल्सरी झाली आहे. आधार कार्ड म्हणजे आपली ओळख पटवून देण्याचा पुरावा. परंतु आतापर्यंत हे आधार कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर, किंवा आधारच्या ॲपवर जाऊन ओटीपी पासपोर्ट आणि नंतर डाउनलोड अशी प्रक्रिया होती परंतु आता ही प्रक्रिया सोपी आणि झटपट झाली आहे.
व्हाट्सअप वरून आधार कार्ड कसे डाउनलोड करावे ?
नवीन सेवा my Gov हेल्पडेस्क या सरकारी व्हाट्सअप सुविधा मार्फत अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमची आधार कार्ड मिळणार आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची गरज नाही फक्त तुमच्या व्हाट्सअप मध्ये खालील स्टेप फॉलो करा :

- तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये 9013151515 हा नंबर My Gov Helpdesk या नावाने सेव करायचा आहे .
- यानंतर व्हाट्सअप मध्ये जाऊन तुम्हाला या नंबर वरती Hi असा मेसेज पाठवायचा आहे.
- यानंतर तुम्हाला रिप्लाय मध्ये अनेक सरकारी सेवा दिल्या जाते त्यामध्ये तुम्हाला “डाऊनलोड आधार” हा पर्याय दिसेल.
- आता तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे.
- त्यानंतर तुमच्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती OTP येईल.
- तुम्ही OTP टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती आधार कार्ड पीडीएफ डाउनलोड होणार आहे.
आधार कार्ड PDF उघडण्याची पासवर्ड काय ?

तुमची आधार कार्ड पीडीएफ ही पासपोर्ट प्रोटेक्ट असणार आहे.
यामध्ये तुम्हाला पासपोर्ट टाकायचे आहे उदाहरणार्थ : तुझे नाव कॅपिटल अक्षरांमध्ये आणि तुमचा जन्म वर्ष ( NITESH1990)
यानंतर तुमचे आधार कार्ड ओपन होईल ते आधार कार्ड तुम्ही सेंड करू शकता किंवा सेव्ह करू शकता.
व्हाट्सअप वर आधार कार्ड डाउनलोड करण्याचे फायदे :
तुम्हाला कुठल्याही वेबसाईटवर जाण्याची गरज नाही, तुम्ही अगदी जलद गतीने तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला साइटवरून आधार कार्ड डाउनलोड करायचे म्हटले तर त्याला अनेक साइटवर जाऊन आधार कार्ड डाउनलोड करावी लागत आहे आणि जास्त इंटरनेटचे ज्ञान नसल्यामुळे अनेक लोकांनाही जमत नाही परंतु आता व्हाट्सअप वरून तुम्ही सहजपणे आधार कार्ड डाउनलोड करू शकता.
अनेक खेड्या गाव ठिकाणी नागरिकांना आधार कार्ड मिळवण्यासाठी शहरामध्ये यावं लागतं. या ठिकाणी अनेक नागरिकांना योजना साठी आधार कार्ड ची गरज भासते, उदाहरणार्थ आपण घेऊ की एका गावातील शेतकऱ्याला पी एम किसान योजनेसाठी आधार कार्डची गरज आहे, गावात इंटरनेट सेवा नसल्याने या शेतकऱ्याला आधार कार्ड मिळवणे कठीण झाले होते. परंतु आता या सरकारच्या नवीन सुविधामुळे तुम्ही व्हाट्सअप वरून झिरो मिनिटांमध्ये तुमच्या आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

आधार कार्ड व्हाट्सअप वर मिळत असलं तरी तुम्ही दिलेल्या ओटीपी शिवाय तुमचा आधार कार्ड कुठेही डाउनलोड होणार नाही. ही संपूर्ण प्रोसेस भारत सरकारचे डिजिटल सुरक्षा मानकानुसार सुरक्षित ठेवण्यात आली आहे.
