WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज पासून फोन पे, गुगल पे च्या नियमात मोठा बदल! आता ग्राहकांना एका दिवसात करता येणार एवढा व्यवहार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPI Rule Change: आज कालच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल वरून पैसे पाठवणे, बिल भरणे किंवा एखादी वस्तू खरेदी करणे ही गोष्ट एकदम सामान्य झाली आहे. अगदी गावातील शेतकरी असो किंवा शहरातील व्यापारी असो प्रत्येक जण फोन पे गुगल पे पेटीएम यासारख्या अँप चा वापर करून डिजिटल व्यवहार करत आहेत. पण आता या व्यवहाराबद्दल एक मोठा नियम बदलला आहे. ऑनलाइन व्यवहार करताना सर्वात मोठी अडचण निर्माण होण्याची ती म्हणजे मोठी रक्कम ट्रान्सफर करताना त्यावर असलेली मर्यादा. मात्र आता नियमानुसार या मर्यादित वाढ करण्यात आली आहे.UPI Rule Change

UPI Rule Change
UPI Rule Change

ऑनलाइन व्यवहाराच्या या मर्यादीवर उपाय म्हणून एनपीसीआय (NPCI) आजपासून यूपीआयच्या नियमांमध्ये मोठा बदल करत आहे. या नव्या नियमांमुळे सर्वसामान्यांना मोठा व्यवहार करण्यासाठी कुठेही धावपळ करायची गरज लागणार नाही. नवीन नियमानुसार आता व्हेरिफाइड मर्चंट सोबत एका दिवसात तब्बल 10 लाख रुपयापर्यंत ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे. म्हणजे जर कुणी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असेल, विमा प्रीमियम भरत असेल, क्रेडिट कार्डचे बिल भरत असेल किंवा गृह कर्जाचा हप्ता भरत असेल तर त्यांना मर्यादा चा अडथळा निर्माण होणार नाही.

UPI Rule Change
UPI Rule Change

पर्सनल व्यवहाराला किती मर्यादा असणार?

नवीन नियमानुसार, फक्त व्हेरिफाइड मर्चंट साठीच मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की दोन व्यक्तींमध्ये पैसे पाठवण्याची मर्यादा पूर्वीसारखीच आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त एक लाख रुपये पाठवू शकतो. यामध्ये दैनंदिन व्यवहार करणारे व्यक्ती येतात मात्र मोठे वैयक्तिक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बँकेचा पर्याय वापरता येऊ शकतो.

UPI Rule Change
UPI Rule Change

कुठे मिळणार फायदा?

  • शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या रकमा रक्कमा सहज ट्रान्सफर करता येतील.
  • विमा प्रीमियम भरणारे ग्राहकांना एकाच वेळी लाखोचे प्रीमियम भरता येईल.
  • क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना आता दिवसात सहा लाख रुपये पर्यंतचे क्रेडिट कार्ड बिल यूपीआय वरून भरता येईल. प्रवास व शिक्षण फी फ्लाईट, हॉटेल बुकिंग किंवा परदेशी शिक्षणासाठी मोठे व्यवहार करता येतील.
  • कर्ज व EMI भरणाऱ्यांसाठी प्रति व्यवहार पाच लाख आणि दिवसाला दहा लाख रुपयापर्यंत मर्यादा ठेवण्यात आली आहे.

गेले काही वर्षात प्रत्येक गावात यूपीआय व्यवहार झपाट्याने वाढत आहेत. किराणा दुकानात शंभर रुपयाचा भाजीपाला घेतला तरी किंवा कोड स्कॅन करून पैसे पाठवले जातात. पण मोठी रक्कम पाठवायचे असेल तर एक लाख रुपयाचे लिमिट असल्यामुळे लोकांना दोन दोन तीन दिवस काही वेळा पैसे ट्रान्सफर करावे लागतात. या त्रासावर तोडगा काढण्यासाठी या नियमात बदल झाला आहे.

UPI Rule Change
UPI Rule Change

डिजिटल व्यवहारामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात मोठी सोय निर्माण झाली आहे. हातात पैसे ठेवण्याची गरज भासत नाही यामुळे चोरी होणे फसवणूक होणे याचा धोका खूप कमी प्रमाणात आहे. आता त्यात आणखीन एक मोठे पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. NPCI ने मोठ्या व्यवहाराच्या मर्यादा दहा लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. हा बदल फक्त श्रीमंत व्यापारांसाठीच नाही तर सामान्य लोकांसाठी ही दिलासा देणार आहे. कारण शिक्षण आरोग्य कर्ज प्रवास या सर्व क्षेत्रासाठी ही मोठी रक्कम एका क्लिकवर भरणे खूप महत्त्वाचं ठरत आहे.

1 thought on “आज पासून फोन पे, गुगल पे च्या नियमात मोठा बदल! आता ग्राहकांना एका दिवसात करता येणार एवढा व्यवहार?”

Leave a Comment

error: Content is protected !!