Pm Kisan Yojana 23 hapta | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. जर तुम्ही देखील केंद्र सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या Pm किसान योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी नक्की वाचा कारण जर पुढचा हप्ता तुम्हाला मिळवायचा असेल तर हे काम करणे खूप गरजेचे आहेत नाहीतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही. Pm Kisan Yojana 23 hapta
सध्या शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट कोसळले आहे ते म्हणजे अवकाळी पावसामुळे आणि गारपीटी मुळे, शेतकऱ्यांना शेती करत असताना अशा संकटांना सामोरे जावे लागते कधी अवकाळी पाऊस अतिवृष्टी तर कधी दुष्काळ पूर परिस्थिती, आणि त्यातच जर शासनाच्या अशा योजना बंद झाल्या तर पुढील हप्ता मिळणे
हे पण वाचा : पीएम किसानचा २३ वा हप्ता: ‘या’ ३ चुका केल्या तर २,००० रुपये विसरा! सरकारने नियम केले कडक, पाहा सविस्तर
देखील कठीण होत असते, या शासन वेळोवेळी बदल गरज असते, परंतु शेतकऱ्यांना हे झालेले बदल माहीत नसल्यामुळे त्यांचा पुढील हत्या बंद होतो त्यामुळे नवीन झालेल्या बदल हे माहीत असणे शेतकऱ्यांना गरजेचे आहे जर तुम्हाला हा हप्ता सुरू ठेवायचा असेल तर खालील दिलेली माहिती वाचा.
हे पण वाचा : नमो शेतकरीचा हप्ता खात्यात आला का? इथे क्लिक करून तुमचे लाभार्थी यादीत नाव चेक करा
राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पावसामुळे शेती संकटात आली आहे, तर दुसरीकडे बळीराजा आता पुढील मदतीकडे डोळे लावून बसला आहे. पण याच दरम्यान एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे, जी अनेक शेतकऱ्यांच्या लक्षातच नाही आणि हीच चूक पुढच्या पीएम किसानच्या हप्त्यावर थेट परिणाम करू शकते. त्यामुळे ही बातमी प्रत्येक शेतकऱ्याने शेवटपर्यंत वाचणं खूप गरजेचं आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात, आणि महाराष्ट्रात राज्य सरकारकडून आणखी 6 हजार रुपये मिळतात म्हणजेच एकूण 12 हजार रुपये वर्षाला थेट खात्यात येतात अनेक घरांसाठी ही रक्कम म्हणजे खरी शेतीची आधाररेषा बनली आहे पण आता 23 व्या हप्त्याच्या आधी सरकारने नियम कडक केले आहेत.
सध्या गावागावात एकच चर्चा आहे. हप्ता कधी येणार? पण खरा प्रश्न हा आहे की आपल्याला हप्ता मिळणार का नाही? कारण सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की, काही महत्त्वाची कामे पूर्ण केली नाहीत तर हप्ता खात्यात येणारच नाही
हे पण वाचा : 50 शेळी गट अनुदान योजना सुरू, पहा पात्रता आणि निकष कसा मिळेल लाभ
पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे e-KYC अजूनही अनेक शेतकरी e-KYC पूर्ण केलेली नाही. काही जण म्हणतात वेळ मिळाला नाही, तर काहींना प्रक्रिया कळत नाही. पण आता वेळ निघून चालली आहे e-KYC पूर्ण नसेल तर तुमचं नाव यादीतून थेट वगळलं जाऊ शकतं आणि मग कितीही वाट पाहिली तरी हप्ता मिळणार नाही.
दुसरी मोठी अट म्हणजे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणं अनेक शेतकऱ्यांचे खाते अजूनही अपडेट नाही बँकेत नाव वेगळं, आधारमध्ये वेगळं अशा छोट्या चुका मोठं नुकसान करून जातात हप्ता पाठवला तरी तो परत जातो त्यामुळे लगेचच बँकेत जाऊन खातं आणि आधार लिंक आहे का ते तपासून घ्या
तिसरी आणि सगळ्यात दुर्लक्षित गोष्ट म्हणजे जमिनीची नोंद (Land Record Update) तुमच्या नावावर जमीन आहे का, ती नोंद व्यवस्थित आहे का, हे आता सरकार तपासत आहे फक्त कागदावर नाव असलं तरी चालणार नाही, सगळी माहिती ऑनलाइन अपडेट असणं गरजेचं आहे अनेक शेतकरी इथेच चुकतात
गावात बघायला गेलं तर अनेक शेतकरी म्हणतात
आम्हाला आधी हप्ता मिळायचा, आता का बंद झाला? तर त्याचं कारण हेच आहे नियम बदलले, पण माहिती वेळेवर पोहोचली नाही त्यामुळे अनेक जण आजही अज्ञानात आहेत
दरम्यान, 13 मार्च रोजी 22 वा हप्ता जमा झाला होता त्यानंतर आता 23 व्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे साधारणपणे प्रत्येक 4 महिन्यांनी हप्ता येतो त्यामुळे पुढील हप्ता जुलै किंवा ऑगस्टमध्ये येण्याची शक्यता आहे
पण लक्षात ठेवा तोपर्यंत ही 3 कामे पूर्ण केली नाहीत, तर हप्ता थांबणार हे नक्की आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, या योजनेचा लाभ फक्त पात्र शेतकऱ्यांनाच मिळतो म्हणजेच ज्यांच्याकडे लागवडीयोग्य जमीन आहे, सरकारी नोंद आहे आणि कुटुंबात कोणी आयकरदाता नाही ही सगळी अट पूर्ण असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा : शेतीची नांगरट कधी करावी? योग्य वेळ ओळखा, उत्पादन दुप्पट वाढवा
आज परिस्थिती अशी आहे की, एकीकडे पावसामुळे शेतीचं नुकसान होत आहे, तर दुसरीकडे मिळणारी मदतही कागदपत्रांच्या चुका असल्यामुळे अडकते. त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याने जागं होणं गरजेचं आहे फक्त सरकारकडे बघून चालणार नाही, तर स्वतःही थोडं लक्ष देणं गरजेचं आहे.
शेवटी एकच सांगावंसं वाटतं हप्ता येतो की नाही हे नशिबावर नाही, तर आपल्या कागदपत्रांवर ठरतं म्हणून आजच e-KYC करा, आधार लिंक तपासा आणि जमिनीची नोंद अपडेट करा नाहीतर पुढचा हप्ता हातातून निसटल्यासारखा वाटेल.
