Panjabrao Dakh Weather Forecast April 2026 | हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा अंदाज व्यक्त केला आहे. येत्या १ ते ४ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर वाढणार असून, अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह भीषण गारपीट होण्याची शक्यता डख यांनी वर्तवली आहे. काही भागांत तर चक्क लिंबाच्या आकाराच्या गारा पडणार असल्याने शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
कुठे पडणार गारा? डख यांनी दिली जिल्ह्यांची यादी
पंजाबराव डख यांच्या मते, ही गारपीट संपूर्ण राज्यात नसली तरी काही जिल्ह्यांसाठी ती अत्यंत घातक ठरू शकते. यामध्ये नांदेड, लातूर, बीड, अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, धाराशीव, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागात पुढील ४ दिवस बोरांएवढ्या तर कुठे चिंचोक्याएवढ्या गारा पडू शकतात.
विजांपासून वाचण्यासाठी डख यांचा मोलाचा सल्ला
पाऊस सुरू असताना झाडाखाली थांबण्याची चूक करू नका, असा कडक सल्ला डख यांनी दिला आहे. झाडावर विजा पडण्याचे प्रमाण तब्बल १६ टक्के असते, त्यामुळे शेतात काम करताना पाऊस आला तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. स्वतःच्या जिवाची काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं आहे. १ एप्रिलनंतर पावसाचा जोर वाढून २, ३ आणि ४ एप्रिलला राज्याच्या विविध भागात रोज पाऊस हजेरी लावेल.
शेतकऱ्यांनी आता काय करावे?
५ एप्रिलनंतर राज्याचे हवामान पुन्हा कोरडे होईल, असा दिलासाही डख यांनी दिला आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांनी खालील खबरदारी घ्यावी:
कांदा पीक: कांदा काढून झाला असेल तर तो व्यवस्थित झाकून ठेवावा.
गहू काढणी: गव्हाचे पीक तयार असेल तर ते लवकरात लवकर काढून सुरक्षित ठिकाणी हलवावे.
वीट व्यावसायिक: ५ एप्रिलनंतर विटांचे उत्पादन पुन्हा सुरू करता येईल, तोपर्यंत काम थांबवणे हिताचे ठरेल.
पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा प्रभाव राहणार असल्याने काढणीला आलेला घास वाचवण्यासाठी बळीराजाची आता धावपळ सुरू झाली आहे.

1 thought on “विजांपासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबू नका! पंजाबराव डख यांचा कडक सल्ला; अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार!”