Onion market price | आजचा कांदा बाजार भाव | दिवाळीच्या धामधुमी सकाळ संपत आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा एकदा बाजाराकडे लागलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारामध्ये कांद्याची विक्री मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. आणि दर पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. दिवाळीनंतर काही निवडक बाजार समितीमध्ये 24 ऑक्टोबर रोजी 26 हजार 786 क्विंटल कांद्याचे आवक झाली. या अवकीसोबत दरांमध्ये थोडाफार चढउतार पाहायला मिळाला, पण शेतकऱ्यांच्या मध्ये कांद्याला योग्य भाव मिळत नाही अशी खदखद व्यक्त झाली. (आजचा कांदा बाजार भाव)
राज्यातील लाळसगाव, पिंपळगाव बसवंत, सायखेडा, पारनेर, सोलापूर, जळगाव, अमरावती, पुणे या प्रमुख बाजारामध्ये आजचे दर सरासरी 800 ते 1800 प्रतिक्विंटल असा आहे. लालसगाव बाजारात उन्हाळी कांद्याला किमान चारशे रुपये ते सरासरी 1100 रुपये प्रति दर मिळाला आहे. पिंपळगाव बसवंत येथे किमान पाचशे रुपये तर सरासरी 1200 रुपये, तर सायखेडा मार्केटमध्ये कांद्याला सरासरी 1000 रुपये दर मिळाल्याचे समजते. पारनेर बाजारात मात्र कांद्याला थोडासा चांगला भाव मिळून सरासरी 1250 रुपये दर नोंदवला गेला आहे.

दुसरीकडे सोलापूर बाजारात लाल कांद्याला किमान शंभर रुपये असा सर्वात कमी दर नोंदवला गेला, सरासरी बाराशे रुपयांपर्यंत दर मिळाला. जळगाव बाजारात कांद्याला फक्त 875 रुपयांचा सरासरी दर मिळाल्याने स्थानिक शेतकरी नाराज झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर खत, मजुरी, ट्रान्सपोर्ट खर्च सगळा वजा केला तर त्यांच्यात खिशातून पैसे गेले अस दिसत आहे.
सोलापूर बाजारात पांढऱ्या कांद्याची 600 क्विंटल आवक झाली असून त्याला किमान दोनशे रुपये तर सरासरी 1800 रुपये दर मिळाला. पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला सरासरी एक हजार रुपये दर मिळाला आहे. तर मंगळवेढा बाजारात कांद्याला 1700 रुपये, अमरावती फळ व भाजीपाला मार्केटमध्ये 1300 रुपये तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी 1300 रुपये दर मिळाला.

कोल्हापूर, अकलूज, अकोला, चंद्रपूर, खेड चाकण शरीराच्या ठिकाणी बाजारात कांद्याचे दर स्थिर आहेत. अकलूज बाजारात किमान 300 रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये दर नोंदवला गेला. कोल्हापूर बाजारात कांद्याला 400 ते 2000 रुपये पर्यंत भाव मिळाला. तर अकोला बाजारात किमान 500 ते जास्तीत जास्त 1400 पर्यंत दर गेला होता.
यादरम्यान पिंपळगाव बसवंत, सायखेडा आणि लासलगाव या त्रिकोण पट्ट्यात कांद्याच्या दरावर लक्ष ठेवून व्यापारी खरेदी करत आहेत. काही व्यापाऱ्यांच्या मते, अजून काही दिवस दरात वाढवण्याची शक्यता आहे. कारण दिवाळीनंतर बाजारात थोडी मागणी वाढत आहे. मात्र हवामान कोरडे राहिले आणि नवीन कांद्याचे आवक वाढले तर दर पुन्हा घसरण्याची शक्यता शेतकरी बांधव वर्तवत आहेत.
