WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GST 2.0 लागू: आता तूप, पनीर, इलेक्ट्रॉनिक्स आणि औषधं स्वस्त! वाचा संपूर्ण यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New GST Slabs India 2025 | 22 सप्टेंबर पासून देशभरातील नवीन जीएसटी प्रणाली लागू झाली आहे. जेव्हा 2017 मध्ये जीएसटी आली होती तेव्हा उलथ पालथ झाली होती, तशीच पुन्हा एकदा  मोठा बदल झाला आहे. आतापर्यंत चार कर स्लॅब होते ते म्हणजे , 5%, 12%, 18% आणि 28%  परंतु आता त्यात कपात करून फक्त दोन मुख्य स्लॅब ठेवण्यात आले आहेत 5%  आणि 18%  मात्र अनेक महागड्या वस्तू आणि सीन वस्तूवर 40% कर कायम ठेवण्यात आले आहे. या नवीन बदलामुळे छोट्या मोठ्या उद्योग धंद्यापासून ते मोठमोठ्या कंपन्यापर्यंत सर्वत्र गडबड चालू आहे. 

 गेल्या अनेक महिन्यापासून महागाईने सर्वसामान्य नागरिकांची कंबर मोडली होती, तूप , पनीर, ड्रायफूट्स, अशा रोजच्या जेवणात लागणारे अनेक पदार्थ महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक परेशान होते. गावाकडच्या लग्न समारंभात किंवा सणासुदीला एखांदा तूप डब्बा आणायचं म्हटलं की करत जास्त वैता पण आता जीएसटी दर कपास झाल्याने हे पदार्थ स्वस्त झाले आहेत. अनेक कंपन्यांनी किंमत कमी करण्याची घोषणा देखील केली आहे त्यामुळे आता शेतकरी ते शहरीक राहत सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. 

खाद्यपदार्थात नव्हे तर इलेक्ट्रॉनिक, ऑटोमोबाईल, कार, यासारख्या अनेक गोष्टींवर कर कमी करण्यात आला आहे म्हणजेच आता गावातला एखादा तरुण जर बाईक घ्यायचा विचार करत असेल तर त्याला अनेक रूपांची बचत होणार आहे. शहरातल्या गृहिणीला घरातील फ्रिज वॉशिंग मशीन या गोष्टी घ्यायच्या म्हटलं तर त्यावर देखील कर कमी केला आहे आता सर्वसामान्य माणसांना आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडा हक्काचं बळ मिळणार आहे. 

शिक्षण क्षेत्रात देखील तिला सा मिळणार आहे शालेय साहित्य, अनेक शैक्षणिक उपकरण आणि सेवा या वरचा कर कमी करण्यात आला आहे गावातल्या शाळेत जाणाऱ्या मुलांना बॅकपासून ते शहरातल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फीस पर्यंत फरक पडणार आहे पालकांना हा बदल नक्कीच आनंदित करणार आहे. 

हेल्थकेअर क्षेत्रातील याचा मोठा बदल झाला आहे औषध आणि वैद्यकीय उपकरणावरील 5 टक्के कर कमी करण्यात आला आहे रुग्णालयात दाखल झालेल्या गरीब कुटुंबाला आता औषधाच्या बिलात थोडासा दिलासा मिळणार आहे डॉक्टरांच्या प्रेस्क्रीप्शन नंतर औषधाच्या किमती ऐकून लोकांना धडकी भरायची ती आता काही प्रमाणात कमी होणार आहे. 

परंतु एलपीजी सिलेंडरच्या किमती मात्र कमी झालेल्या नाहीत स्वयंपाक घरातला हाय सर्वात मोठा खर्च तसाच राहिला आहे. त्यामुळे गृहिणीच्या मनात थोडी खंतही आहे पण तरी एकंदरीत बघितलं तर GST 2.0 प्रणालीमुळे दैनंदिन आणि आवश्यक वस्तूच्या किमती बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहेत.

इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे सरकार न कर कमी केला असला तरी बाजारात प्रत्येक ठिकाणी वस्तूच्या किमती खरंच कमी झाल्या आहेत का ? अनेकदा कंपन्या तर कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवत नाहीत म्हणून जर तुम्हाला वाटलं की दुकानात अजूनही वस्तू जुन्यात किमतीत मिळत आहेत तर तुम्ही थेट याची कंप्लेंट दाखल करू शकता. सरकारने यासाठी खास पोर्टल देखील सुरू केली आहे  इथे तुम्ही याची तक्रार करू शकता. 

गेल्या काही वर्षापासून महागाईत आता वाढला होता शेतकरी बांधवाला शेतीतील उत्पादन विकून जितकं मिळायचं त्याच्या निम्म्याहुन घरगुती खर्चात जायचं शहरात काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला देखील पगाराचा मोठा भाग आपल्या रोजच्या खर्चात खर्च करावा लागत होता अशावेळी या नव्या करप्रणालीमुळे प्रत्येक नागरिकाच्या जीवनावर याचा चांगला परिणाम होणार आहे. 

 आता लोकांच्या मनातला खरा प्रश्न म्हणजे खरंच आता वस्तू स्वस्त मिळणार का? की फक्त कागदपत्रे आकडेवारी दर कमी झाले आहेत? अशा प्रश्नाचे उत्तर येत्या काळामध्ये दिसणार आहे परंतु सामान्य माणसाच्या पोटाशी निगडित असलेल्या या निर्णयामुळे लोकांचे मनातील अशीच किरण निर्माण झालेलं दिसत आहे. 

Disclaimer : या बातमीमध्ये दिलेली माहिती विविध सार्वजनिक श्रोतांवर आधारित आहे कर दर किमती किंवा सरकारी नियमांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो. वाचकांनी खरेदी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईट किंवा तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

Leave a Comment

error: Content is protected !!