WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार का? दोन मिनिटात लाभार्थी यादीत नाव चेक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana Maharashtra | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी (NSMNYS) योजनेचा सातवा हप्ता लवकरच पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे जमा करणारी ही महत्त्वाची योजना आहे. या योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी अंतर्गत थेट पैसे जमा केले जातात. सध्या फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रक्रियानंतर लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ यशस्वीरित्या जमा होणार आहे. अशी बातमी प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित झालेली आहे. परंतु जर तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली नाही तर काय करणार? तुमच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे का याची माहिती आपण पाहूया. Namo Shetkari Yojana Maharashtra

या योजनेची पार्श्वभूमी


सध्या शेती करत असताना शेतकऱ्यांमध्ये कर्जबाजारी चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नैसर्गिक आपत्ती हवामानातील अनिश्चितता अवकाळी पाऊस अतिवृष्टी दुष्काळ अशा मोठ्या संकटांना तोंड देत शेतकरी शेती करतो. परंतु याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना कुठेतरी थोडासा हातभार लागावा म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून काढण्यासाठी अर्थसहाय्य देण्यासाठी नमो शेतकरी महा सन्मान (Namo Shetkari Yojana) निधी योजना सुरू करण्यात आली. ही योजना राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये सुरू करण्यात आली. ही योजना केंद्र सरकारच्या Pm Kisan योजनेच्या पार्श्वभूमीवरती राबविण्यात येत आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना नियमित अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे. पात्र शेतकरी ज्यांच्याकडे शेतीची जमीन आहे आणि जे कृषी कामासाठी निगडित आहे. या योजनेअंतर्गत ठराविक रकमेचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातो. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हप्ते जमा झाले आता सातवा हप्ता जमा होणार.

सातवा हप्ता किती शेतकऱ्यांना मिळणार?


अधिकृत आकडेवारीनुसार राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेमध्ये नोंदणी केली आहे म्हणजे जे शेतकरी पीएम किसान योजनेची लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांना मागील सहा हप्ते मिळाले आहेत परंतु आता सातवा हप्त्याची प्रतीक्षा आहे. यामध्ये सरकारच्या आकडेवारीनुसार अंदाजे एक कोटी पेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत आतापर्यंत सहा हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत सातवा हप्ता काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल अशी शक्यता प्रसार माध्यमांमध्ये उपस्थित होत आहे.

तुम्हाला हप्ता मिळणार का चेक करा


शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आमच्या खात्यात पैसे जमा होणार का? यासाठी सरकारने सोपी ऑनलाईन पद्धत उपलब्ध करून दिली आहे. NSMNY अधिकृत संकेतस्थळावरती Beneficiary Status तपासा त्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तिथे तुम्हाला पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा. इथे नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक यापैकी एक निवडा. मोबाईलवर तुमचे एक ओटीपी येईल तो टाका. यानंतर Beneficiary स्टेटस दिसेल त्यामध्ये तुमचे नाव नोंदणी क्रमांक आहे का हे पहा किती हप्ते मिळाले आहेत हे दिसेल.यामध्ये Eligibility details असेल तर शेतकरी पात्र आहे. Ineligitiy दिसेल तर शेतकरी पात्र आहे आणि कारण ही दाखवले जाईल.

काही कृषि तज्ञांच्या मते थेट खातात पैसे जमा होणारा निधी हा शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे मात्र दीर्घकालीन दृष्टीने सिंचन व्यवस्था, पिक विमा योजना आणि बाजारभाव स्थिर ठेवणे या गोष्टींवर भर देणे गरजेचे आहे यामुळे सरकार कोणता निर्णय घेते, याकडे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

(ही माहिती प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे)

Leave a Comment