WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय! 5 लाखा पुढील उपचार मिळणार मोफत ? 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahatma Phule Jan Arogya Yojana : नमस्कार मित्रांनो, दवाखाना म्हटलं की सर्वात आधी  डोळ्यासमोर येतो तो पैसा, कित्येक नागरिक पैशामुळे  दवाखान्याला नजर अंदाज करतात. काही अनेक गरीब कुटुंबामध्ये एक उपचार म्हणजे घरदार विकायची वेळ येते पण आता महाराष्ट्र सरकारने गोरगरीब कुटुंबांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही प्रमुख योजनेमध्ये नवीन 2399  उपचारांचा समावेश केला आहे आणि याला मान्यता देखील दिली आहे. Mahatma Phule Jan Arogya Yojana

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली   त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या आरोग्य हमी सोसायटीच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ही फक्त एक घोषणा नसून गोरगरिबांसाठी महत्त्वाचा निर्णय आहे तसेच आरोग्याच्या क्षेत्रात महाराष्ट्रासाठी ही एक क्रांती ठरणार आहे. 

Mahatma Phule Jan Arogya Yojana
Mahatma Phule Jan Arogya Yojana

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय : 

फडणवीस यांनी यामध्ये स्पष्ट सांगितले की, तालुक्यात ३० घाटांचं रुग्णालय नसेल, तर जिथे सुविधा आहेत तिथेच योजनेचा लाभ द्यावा. म्हणजेच आता गोरगरिब नागरिकांची  गावाबाहेर उपचारासाठी धावपळ कमी होणार आहे आणि त्यांनी खाजगी रुग्णालयाला देखील या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण देखील दिले आहे. .

आता 5 लाखा पुढील महागडे उपचार देखील शक्य ! 

या आधी पाच लाखापर्यंत उपचार मोफत दिले जात होते परंतु आता पाच लाखा पुढील उपचार देखील मोफत दिले जाणार आहे. यामध्ये हदय, फुफुस, किडनी, बोन मॅरो यासारखे अनेक महागडे प्रत्येरोपणासाठी  विशेष कॉपर्स फंड तयार केला आहे. याआधी अशा उपचारांसाठी लाखो रुपये खर्च करावे लागत होते अनेक जण पैसे नसल्यामुळे मृत्यूकडे ढकल्ले  आहेत . 

TMS प्रणाली आणि आधुनिक उपचारांचा समावेश! 

आता राज्याच्या 138 उपचारांची यादी TMS 2.0 प्रणालीशी सुसंगत केली जाणार आहे तसेच आधुनिक उपचार आणि निदान पद्धती आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावर करता येणार आहेत 25 उपचार देखील या योजनेमध्ये समाविष्ट होणार आहेत ही बाब ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. 

या जिल्ह्यांमध्ये विशेष सवलती 

 जिथे अजून आरोग्य सुविधा पोहोचले नाहीत अशा अनेक अकांक्षीत जिल्ह्यातील रुग्णालयांना प्रोत्साहनपर  अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे त्याचबरोबर आदिवासी भागात उपचारांच्या निकषात शिथिलता देण्यात येणार आहे आणि याचा थेट फायदा आता मागास भागातील गरीब व गरजू रुग्णांना होणार आहे. 

Mahatma Phule Jan Arogya Yojana
Mahatma Phule Jan Arogya Yojana

मंत्रिमंडळाची उपस्थिती व पाठिंबा ! 

 या बैठकीला आमंत्रित छगन भुजबळ, संजय शिरसाठ, माधुरी मिसाळ, असे अनेक प्रमुख उपस्थिती होती. तर प्रत्यक्ष आधी तटकरे यांनी दूरदृष्टी प्रणाली द्वारे सहभाग घेतला यावेळी तटकरे आणि शिरसाट यांनी ग्रामीण भागात २० घाटांचा रुग्णालय योजनेत समाविष्ट करावा अशी सूचना देखील दिल्या त्यामुळे अतिशय लहान रुग्णालयांनाही योजनेत समावेश घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

Disclaimer : 

वरील माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे यामध्ये तपशील संबंधित अधिकृत शासकीय संकेतस्थळावर आणि वृत्तपत्रांमध्ये उपलब्ध स्वतःवर आधारित आहे कृपया कोणताही निर्णय घेण्यापूर्वी माहितीची पडताळणी करावी. 

Leave a Comment

error: Content is protected !!