WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात 19 जिल्ह्यात पावसाचे अलर्ट ! राज्यात शाळा कॉलेज बंद 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert :  मागील दोन ते तीन दिवसापासून महाराष्ट्रभर पावसाचा जोर सुरू आहे. मान्सून आता अंतिम टप्प्यात असला तरी शेवटच्या टप्प्यात पावसाने  अक्षरशा धुमाकूळ घातला आहे. काही जिल्ह्यांमध्ये इतका मुसळधार पाऊस झाला आहे की विद्यार्थ्यांच्या सुरक्षासाठी आज अंगणवाडी पासून ते महाविद्यालयापर्यंत शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बीड सोलापूर धाराशिव यासारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आले आहेत आणि पालक व विद्यार्थी यांना या निर्णयाने थोडा दिलासा मिळाला आहे कारण मुसळधार पावसात प्रवास करणे कठीण आहे. 

परंतु हा पाऊस फक्त शाळांच्या सुट्टी पुरताच महाराज नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्यभर मोठा परिणाम करणार आहे. अनेक ठिकाणी पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. सोयाबीन, कापूस, तुर, मका यासारख्या खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान नुकसान इतकं जास्त झाला आहे की शेतकरी वर्ग निराश झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी संघटना आणि विरोधक आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी करीत आहेत. 

फडणीस सरकारने नुकसान भरपाई केली जाहीर 

संपूर्ण परिस्थिती पाहता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी झालेल्या नुकसानासाठी पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना भरपाई जाहीर केली आहे. पण या मदतीची रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याची टीका शेतकरी वर्ग करीत आहे. काही हजार रुपयांची मदत लाखो रुपयांचा नुकसान कशी भरून घेणार ? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे शेतकरी फक्त आर्थिक मदत  मागत नाही तर त्यांना आयुष्यात पुन्हा करण्यासाठी एक सक्षम धोरण हवी आहे. 

Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain Alert

19 जिल्ह्यांना येल्लो अलर्ट ; 

हवामान खात्याने आज 24 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा राज्यातील 19  जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला आहे. म्हणजेच वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचं संकेत आहेत. मुंबई , पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, धुळे, नंदुरबार, जलगांव, अमरावती, यवतमाल, गडचिरोली, गोंदिया,  जवळपास संपूर्ण महाराष्ट्र मध्येच येत्या 24 तासात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. व यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाची जनावरांची विविध काळजी घेण्याचे आव्हान केले आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या सर्व भागात वातावरण अस्थिर राहणार आहे. अनेक ठिकाणी वादळी वारे काही ठिकाणी मुसळधार सरी तर काही ठिकाणी आभाळ भरून येणार आहे. आज महाराष्ट्रभर असे मिश्र वातावरण नागरिकांना अनुभवायला मिळणार आहेत, त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे भविष्य अधिक असुरक्षित झालेले आहे. 

Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain Alert

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर बुधवारी पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार आहे. याचा अर्थ शाळांना पुन्हा सुट्टी द्यावी लागण्याची शक्यता आहे पालकांनी मुलांना सुरक्षित ठेवण्याची आव्हान केलं जात आहे,  पालकांनी मुलांना सुरक्षित ठेवण्याची आव्हान केले जात आहे.  सर्वात मोठी चिंता ही शेतकऱ्यांसाठी आहे कारण ओल्या दुष्काळाने फक्त पिकाचा नुकसान नाहीतर संपूर्ण अर्थचक्रवर  परिणाम होत आहे. बाजारपेठेत अन्नधान्याच्या किमती वाढतात, शहरी भागात महागाईचा फटका बसतो आणि ग्रामीण भागात बेरोजगारी व कर्जाचा वाढत आहे. 

शेतकरी आपल्या पिकासोबतच, जानवर, घर ,शेती मजूर कुटुंब यासाठी संघर्ष करत आहे.  सरकारने यावेळी मदत केली नाहीतर या शेतकऱ्यांच्या जीवन बनण्याच्या संघर्षाला तोडगा नाही , विरोधकांची मागणी खरी आहे की चुकीची हे राजकारणाचं सक्षमीकरण आहे पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्याला मिळणारी मदत ही त्याच्या जगण्याचा आधार ठरणार आहे .

1 thought on “Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात 19 जिल्ह्यात पावसाचे अलर्ट ! राज्यात शाळा कॉलेज बंद ”

Leave a Comment

error: Content is protected !!