WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज हवामान हवामानात झाला मोठा बदल, या जिल्ह्यांना तातडीचा मोठा संदेश वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra hawamaan Andaaz | राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः शेतकऱ्यांचा जीव हैराण करून सोडला होता, आणि आता पाऊस थोडासा कमी झाला असला तरी संकट अजून पूर्णपणे टळलेलं नाही, असंच चित्र आज पुन्हा समोर आलं आहे हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आज ६ एप्रिल रोजी विशेषतः विदर्भातील अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्यामुळे या भागातील शेतकरी पुन्हा एकदा धास्तावलेले दिसत आहेत कारण आधीच गारपीट आणि पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झालेले असताना हा नवीन अंदाज त्यांच्या चिंतेत भर टाकणारा ठरत आहे. Maharashtra hawamaan Andaaz

दरम्यान, उर्वरित महाराष्ट्रात मात्र हवामान वेगळाच रंग दाखवताना दिसत आहे, काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर काही भागात उन्हाचा चटका वाढताना दिसतोय, म्हणजेच एकाच राज्यात दोन टोकाचं हवामान अनुभवायला मिळत आहे दिवसा तापमान वाढतंय आणि रात्री उकाडाही जाणवतोय, त्यामुळे शेतकऱ्यांसोबत सामान्य जनतेलाही या बदलत्या हवामानाचा त्रास सहन करावा लागत आहे सोलापूरमध्ये काल ३८ अंशांच्या वर तापमान नोंदवलं गेलं, तर धुळे भागात किमान तापमान १५ अंशांपर्यंत खाली आलं, ही तफावतच सध्या वातावरण किती अस्थिर आहे हे दाखवते

हवामान तज्ज्ञांच्या मते, दक्षिण भारतात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि वरच्या स्तरावर असलेल्या वाऱ्यांच्या हालचालीमुळे हा बदल घडतोय, त्यामुळे अजून काही दिवस तरी असंच मिश्र हवामान राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या काळात अचानक वीजा कोसळण्याच्या घटनाही वाढत आहेत, त्यामुळे शेतात काम करताना किंवा जनावरं चारताना विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

हे पण वाचा : राज्यात पुन्हा एकदा मोठा इशारा, या जिल्ह्यांना जोरदार गारपीट होणार? वाचा सविस्तर

याचा सर्वात मोठा फटका सध्या शेतीला बसताना दिसतोय. अनेक भागात काढणीला आलेली गहू, हरभरा, ज्वारी ही पिकं आधीच वाऱ्याने आडवी झाली आहेत, तर काही ठिकाणी कांदा, भाजीपाला आणि फळबागांनाही नुकसान सहन करावं लागलं आहे. अशा परिस्थितीत शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे, कारण एकीकडे उत्पादन कमी होतंय आणि दुसरीकडे बाजारात दर स्थिर नाहीत. अशा वेळी हवामानाचा हा लपंडाव आणखी त्रासदायक ठरतोय.

तज्ज्ञ सांगतात की, या दिवसात शेतकऱ्यांनी थोडी काळजी घेतली तर नुकसान कमी करता येऊ शकतं ज्या पिकांची काढणी झाली आहे ती लगेच सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, शक्य असेल तर ताडपत्रीने झाकून ठेवावी, उभ्या पिकांना आधार द्यावा आणि जनावरांना मोकळ्या जागी न ठेवता सुरक्षित गोठ्यात ठेवावं विशेषतः वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली उभं राहणं टाळावं कारण विजांचा धोका वाढलेला असतो.

एकंदरीत पाहिलं तर राज्यातील हवामान अजूनही स्थिर झालेलं नाही, कधी पाऊस, कधी ऊन, कधी वादळ असा हा खेळ सुरूच आहे. त्यामुळे बळीराजाने आता प्रत्येक दिवस हवामान पाहूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. पुढील काही दिवस फार महत्त्वाचे आहेत कारण या काळात घेतलेले निर्णयच पुढील उत्पन्न ठरवणार आहेत आणि म्हणूनच शेतकरी सध्या आकाशाकडे पाहतच दिवस काढतोय.

हे पण वाचा :  10 वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी ! इंटेलिजन्स ब्युरो मध्ये मेगा भरती, पगार 69 हजार रुपयापर्यंत 

Leave a Comment