Ladki Bahin Yojana September Hapta | राज्यातील लाखो महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आता लवकरच महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे. या योजनेच्या हप्ता बाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. या नवीन आलेल्या अपडेट मध्ये उद्यापासून सप्टेंबर महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू होणार आहे आणि काही तासातच पात्र महिलांच्या खात्यात ₹1500 रुपये जमा होतील. Ladki Bahin Yojana September Hapta
गेले काही दिवसांपासून महिलांमधून या महिन्याचा हप्ता केव्हा येणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. काही महिला म्हणत होत्या सणासुदीचा काळ आहे आणि आम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अखेर सरकारकडून मोठी घोषणा झाली असून लवकरात लवकर महिलांच्या खात्यावर हा
हप्ता जमा होणार आहे.

आदिती तटकरे यांनी सांगितल की, पुढील दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात रक्कम जमा होईल. तसेच सर्व लाडक्या बहिणींनी पुढील दोन महिन्यात इ-KYC प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा लाभ बंद होऊ शकतो असे देखील सांगितल आहे.
E -केवायसी कुठे करायची?
महिला व बालविकास विभागाने यासाठी एक अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिला आहे ladkibahin.maharashtra.gov.in याच वेबसाईटवर लाभार्थ्यांनी e KYC करायची आहे. पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकासह पडताळणी करणे आवश्यक आहे. सरकारने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की या वेबसाईट शिवाय इतर कोणत्याही ठिकाणी आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये.

तसेच आदिती तटकरे पुढे बोलत असताना म्हणाल्या की, ही योजना म्हणजे फक्त पैशांची मदत नाही, तर महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाची क्रांती आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या आयुष्यात सन्मानाने स्थैर्य आणण्याचे हे मोठ पाऊल आहे.
जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात. ज्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील महिलांना या योजनेमध्ये लाभ दिला जातो. सरकारच्या मते आत्तापर्यंत लाखो महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा थेट लाभ झाला आहे.

या घोषणेमुळे राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांना मोठा लाभ मिळाला आहे. काहीजणी म्हणत आहेत, दिवाळी जवळ आली आणि हप्ता पण आला त्यापेक्षा मोठ गिफ्ट काय असू शकतात? महिलांनो आता एवढेच लक्ष ठेवा ई केवायसी दोन महिन्यात पूर्ण करा, अधिकृत वेबसाईटवरच माहिती द्या, आणि पुढील हप्त्यांचा लाभ वेळेवर मिळवण्यासाठी तयार राहा.
