Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जानेवारी महिना संपून फेब्रुवारी सुरू झाला तरीही अनेक महिलांच्या खात्यात अजूनपर्यंत जानेवारीचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींना एकच प्रश्न पडला आहे. पुढील हप्ता कधी मिळणार? दरम्यान यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार अशा रोजच्या गरजांसाठी या योजनेतील ₹1500 ची रक्कम अनेक कुटुंबांसाठी आधार ठरते. मात्र, हप्ता उशिरा येत असल्याने लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता अधिकच वाढली आहे.
जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता लांबणीवर गेला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपूर्वी हप्ता जमा होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. फेब्रुवारी महिना सुरू होऊनही खात्यात पैसे न आल्यामुळे अनेक महिला बँकांच्या फेऱ्या मारताना दिसत आहेत. काही ठिकाणी e-KYC, कागदपत्रांची पडताळणी किंवा तांत्रिक अडचणी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शासनाकडून याबाबत अद्याप कोणतीही ठोस अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे एकत्र मिळणार का?
सध्या सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की, जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र मिळणार का? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर जानेवारीचा हप्ता आणखी काही दिवस लांबणीवर गेला, तर महिलांच्या खात्यात दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र म्हणजेच ₹3000 जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक योजनांमध्ये याआधीही अशा प्रकारे थकलेले हप्ते एकत्र दिल्याचे उदाहरणे आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना एकत्र रक्कम मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, सध्या ही केवळ शक्यता असून यावर शासनाचा अंतिम निर्णय येणे बाकी आहे.
अधिकृत माहिती कधी येणार?
लाडकी बहीण योजनेबाबत शासन लवकरच स्पष्ट भूमिका मांडण्याची शक्यता आहे. महिला व बालविकास विभागाकडून किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतरच नेमकी परिस्थिती स्पष्ट होईल. तोपर्यंत महिलांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
लाडक्या बहिणींनी काय करावे?
जर तुमचा हप्ता अडकलेला असेल तर,
- तुमचे e-KYC पूर्ण आहे का हे तपासा
- बँक खाते आधारशी लिंक आहे का ते तपासा
- अर्जामध्ये कोणतीही चूक तर नाही ना, याची खात्री करा
अनेक वेळा छोट्या त्रुटींमुळेही पैसे अडकतात. त्यामुळे वेळेत दुरुस्ती केल्यास पुढील हप्ता मिळण्यास अडचण येत नाही. Ladki Bahin Yojana
महिलांसाठी योजना, पण प्रतीक्षा कायम…
लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू करण्यात आली असली, तरी हप्त्यांतील विलंबामुळे अनेक महिलांना मानसिक ताण सहन करावा लागत आहे. शासनाने लवकरात लवकर स्पष्ट निर्णय घेऊन महिलांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जानेवारी–फेब्रुवारीचे ₹3000 एकत्र येणार की नाही, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अधिकृत अपडेट येताच सर्वात आधी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा.

