WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? How to get a Kunbi certificate?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

How to get a Kunbi certificate? : महाराष्ट्र मध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय जलवंत बनला आहे. गेल्या अनेक वर्षपासून मराठा समाजाने शासनापुढे मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडलेला आहे. मराठा समाजाने आता मोठ्या प्रमाणावरती आंदोलन देखील सुरू केलेले आहे, हजारो युवक रस्त्यावर उतरले, शेकडो आई-वडिलांनी आपल्या लेकरांच्या भवितव्यासाठी आंदोलनात जीव देखील दिला. आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनानंतर राज्य सरकार वर प्रचंड दबाव आला आणि शेवटी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे मराठा समाजातील नागरिकांना कुणबी म्हणून जात प्रमाणपत्र काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण साधा शेतकरी, विद्यार्थी किंवा बेरोजगार युवकाला अजूनही एक मोठा प्रश्न पडतोय? हे मराठा कुणबी प्रमाणपत्र नेमकं कसं काढायचं? (How to get Maratha Kunbi certificate?) कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात? आणि प्रक्रिया काय आहे? आज आपण हे सर्व अगदी सोप्या आणि योग्य भाषेमध्ये जाणून घेऊया. How to get a Kunbi certificate?

आंदोलनातून मोठा निर्णय


माननीय मनोज जारंगे पाटील यांनी जालना जिल्ह्यात सुरू केलेल्या आंदोलन हा टर्निंग पॉईंट ठरला. हजारो लोकांनी त्या आंदोलनाला साथ दिली. रोज नवीन मोर्चे, उपोषण, निदर्शन सुरू झाली. सरकारी चांगलं अडचणीत आलं. शेवटी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की, जुना हैदराबाद गॅजेट हा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.
हैदराबाद संस्थान जुन्या काळात अनेक ठिकाणी मराठा समाज कुणबी म्हणून नोंदवला गेला होता. त्या नोंदी आजच्या काळात शोधून त्या आधारावर लोकांना जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हा निर्णय लाखो मराठा समाजातील नागरिकांसाठी ऐतिहासिक ठरला आहे.

How to get a Kunbi certificate
How to get a Kunbi certificate

गाव पातळीवर समिती


प्रमाणपत्र देण्यासाठी जबाबदारी फक्त कागदांवर नको म्हणून शासनाने प्रत्येक गावात विशेष समित्या गठीत केल्या आहेत. या समितीत ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत सचिव, कृषी अधिकारी हे तीन अधिकारी असणार आहेत. जे अर्जदाराच्या वंशावळी सोबतच जुन्या नोंदीची पडताळणी करतील. समितीचा अहवाल मिळाल्यानंतरच पुढे अर्ज जाईल.

कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज कुठे करायचा?


प्रत्येक अर्जदाराने थेट उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे अर्ज करावा लागेल.

  • अर्ज स्वीकारला गेल्यावर तो स्थानिक समितीकडे तपासणीसाठी पाठवला जाईल.
  • समिती वंशावळ तपासेल, जुनी नोंदी बघेल.
  • अहवाल परत SDO कडे येईल.
  • त्यानंतर SDO अंतिम निर्णय घेतील प्रमाणपत्र द्यायचे की नाही?

कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

How to get a Kunbi certificate
How to get a Kunbi certificate

अर्ज करताना योग्य कागदपत्रे नसतील तर अडचण होऊ शकते म्हणूनच आधीच तयारी करून ठेवणे गरजेचे आहे.

  • यामध्ये जमीन धारकेचा पुरावा अर्जदार किंवा त्याचे पूर्वत शेती करत असतील तर जमीन संबंधित दाखला.
  • प्रतिज्ञापत्र जर जमीन नसल्यास, 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी पूर्वज गावात राहत होते याबाबत शपथपत्र.
  • नातेसंबंध पुरावा अर्जदाराच्या नातेवाईकांना कुणी प्रमाणपत्र मिळाले असेल तर त्या संबंधित दाखला.
  • ग्रामपंचायत दाखले, शालेय दाखले, जुनी नोंदवही, उत्पन्न दाखले इत्यादी.

प्रक्रिया टप्प्याटप्प्याने


1) अर्जदाराने SDO कार्यालयात अर्ज करावा.
2) अर्ज समितीकडे जाईल.
3) समिती वंशावळ तपासेल, गावकऱ्यांची चौकशी करेल.
4) अहवाल तयार करून SDO कडे जाईल.
5) अंतिम प्रमाणपत्र जारी होईल किंवा अर्ज नकारला जाईल.

यामध्ये कुणबी प्रमाणपत्र काढत असताना अनेक अडचण येणार आहेत. शेतकरी, मजूर किंवा बेरोजगार युवक अर्ज करायला जातो तेव्हा प्रचंड कटाकटीला समोर जावं. अनेकांकडे जुनी जमीन नोंदणीच नाही, जुने दाखले गहाळ आहेत, ग्रामपंचायत जुन्या नोंदी नीट सापडत नाहीत, अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांची अनस्ता, यामुळे लोकांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी महिने चकरा मारावे लागतात.

परंतु मराठा समाजातील हजार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी खूप खर्च करावा लागतो. कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यास ओबीसी आरक्षणात प्रवेश मिळतो. त्यांना शिष्यवृत्ती, फी मध्ये सूट, नोकरीत आरक्षण मिळतं. म्हणजे एका प्रमाणपत्रामुळे गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्याचा मार्ग बदलतो.

शासनाने देखील या संपूर्ण प्रक्रियेसाठी समित्या घटित केल्या आहेत. समिती सदस्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. जात प्रमाणपत्राच्या नियमावली चौकशीची पद्धत, अहवाल तयार करण्याची प्रक्रिया. या सगळ्यांचे मार्गदर्शन होणार आहे. म्हणजे प्रमाणपत्राची प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न आहे.

कुणबी प्रमाणपत्र म्हणजे काय ?


कुणबी हा एक पारंपरिक शेती संबंधित जात वर्ग आहे. जो मुख्यत पश्चिम भारतात आढळतो, विशेषत महाराष्ट्रात. शेती, भाजीपाला लागवड, पशुपालन हे त्यांचे पारंपरिक व्यवसाय आहेत.
महाराष्ट्रात कुणबी लोकांना अन्य मागासवर्गीय (other Backward Class OBC) मध्ये समाविष्ट केले गेला आहे. इतिहासात काही कुणबी समाजातील लोकांना मराठा म्हणून ओळखलं जात आहे. म्हणजे कुणबी आणि मराठा या समुदायांमध्ये सीमारेषा काही ठिकाणी अपष्ट असलेली आहे. काही मराठा जे पूर्वी शेती करणाऱ्यांची कुणबी पूर्वज होते यांना मराठा ओळखलं जातं.

Kunbi हा शब्द शेतकऱ्यांसंबंधीत असा आहे. काही अभ्यासानुसार Kun+ Bi याचा अर्थ होतो की बाकी लोक + बियाणं/ पीक म्हणजे शेती संबंधित माणसं. दुसरा अर्थ असा आहे की कुणबी हा शेतकरी/ कृषी काम करणाऱ्या लोकांसाठी वापरला जाणारा सामान्य शब्द आहे. कुणबी हे सामान्य शेती, बोबड जमिनींचे कामे, घरगुती शेती इत्यादी करणाऱ्या लोकांना म्हटले जाते.


राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या कुणबी समाजाचा मोठा सहभाग आहे. शेकडो लोक राज्यात अनेक गावत शेती सहकारी संस्था सारख्या गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत. काळानुसार काही कुणबी लोकांनी आर्थिक स्थिती सुधारली, पद आणि प्रतिष्ठा मिळवली. त्यामुळे काही कुणबी समाजातील लोकांना मराठा असं म्हणण्याची प्रथा दिसू लागली आहे. पण कायदेशीर आणि प्रशासकीय दृष्ट्या हे सर्व ठिकाण समजून परिस्थिती वेगळी आहे.

How to get a Kunbi certificate
How to get a Kunbi certificate

मराठा आरक्षण, मराठा कुणबी, प्रमाणपत्र सारख्या धरणात्मक निर्णयामुळे कुणबी समाजाला न्याय मिळण्याचा हेतू आहे. सरकारने हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबी नोंदी आढळल्यास त्या आधारावर मराठा सोबत कुणबी उपरांबद्दल मिळू शकेल असा निर्णय घेतला आहे.

हैदराबाद गॅजेट म्हणजे काय ?


हैदराबाद गॅजेट 1918 चा एका दस्तऐवजाचा भाग आहे. जो त्या काळी निजामांच्या शासन असलेल्या हैदराबाद राज्याचे श्वास्वत आणि अधिकृत नोंदणीच पुस्तक आहे. यामध्ये त्या काळातील लोकसंख्या, जाती, व्यवसाय, शेती जमिनीची मालकी यासारख्या गोष्टींची माहिती नोंदवली आहे.
गॅजेटियर मध्ये Marathwada भाग सामील आहे. जे त्यावेळी हैदराबादच्या राजाच्या भागात होते. त्यामुळे हैदराबाद गॅजेट मधील नोंदी आजच्या मराठवाड्याच्या जिल्ह्यांनीही लागू होतात.

महाराष्ट्र सरकारचा नवीन निर्णय ?

महाराष्ट्र सरकारने ही गॅजेट इयर नोंद मान्य केली आहे, म्हणजे ज्यांच्या कुटुंबाचे वंशावळ हैदराबाद कुणबी जात म्हणून नोंद आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकेल. हे प्रमाणपत्र ओबीसी किंवा मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील. गाव पातळीवर समित्या तयार केल्या जात आहेत ज्या अर्जदारांची वंशावळ, रसद दाखले, जमिनींची नोंद, विविध पुरावे तपासतील. GR मधील नियमानुसार, काही तारखा यांच्या आधीचा पुरावा असेल तर त्यांचा विचार केला जाईल. जर जमीन नसल्यास, गावातील किंवा पूर्वजांचे दाखले, ग्रामपंचायत नोंदी, उत्पन्न दाखले, इतर पुरावे वापरता येतील. यामध्ये ओबीसी आरक्षणाचा लाभ, शिक्षण आणि नोकरीची संधी, कानूनी मान्यता मिळते.

Leave a Comment

error: Content is protected !!