WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सोनं-चांदी झालं स्वस्त! एकाच दिवसात सोन्याच्या भावात 7,400 रुपयांची मोठी घसरण; पाहा आजचे ताजे दर!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Drop Today | सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजची सकाळ मोठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. देशांतर्गत वायदा बाजारात म्हणजेच MCX वर आज बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे भाव तब्बल 4.92 % तर चांदीचे दर 6% टक्क्यांनी कोसळले आहेत. मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावामुळे डॉलर मजबूत झाला आणि त्याचा थेट परिणाम आपल्याकडील मौल्यवान धातूंच्या किमतीवर झाला आहे.

Gold Price Drop Today
Gold Price Drop Today

एका दिवसात 7,400 रुपयांची सूट!

गेल्या शुक्रवारी सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम १,४४,८२५ रुपयांवर बंद झाले होते. मात्र, आज आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्यात ७,४४८ रुपयांची मोठी घट होऊन भाव १,३७,३७७ रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या बाबतीत बोलायचे झाले तर, चांदी तब्बल १४,३०४ रुपयांनी स्वस्त होऊन २,१३,१६६ रुपये प्रति किलोवर आली आहे. ही घसरण गेल्या काही महिन्यांतील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा भाव काय? (२४ कॅरेट)

मुंबई: १,४५,९६० रुपये प्रति १० ग्रॅम

पुणे/दिल्ली: १,४६,११० रुपये प्रति १० ग्रॅम

चेन्नई: १,४८,५७० रुपये प्रति १० ग्रॅम

बंगळुरू: १,४५,९६० रुपये प्रति १० ग्रॅम

Gold Price Drop Today
Gold Price Drop Today

शेअर बाजारालाही बसला तडाखा!

फक्त सोनं-चांदीच नाही, तर शेअर बाजारातही आज ‘ब्लॅक मंडे’ पाहायला मिळाला. सेन्सेक्स १३१६ अंकांनी कोसळला असून निफ्टी २३,००० च्या खाली आला आहे. जागतिक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण असले, तरी सर्वसामान्य ग्राहकांसाठी मात्र दागिने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं बोललं जात आहे. आपल्या घरातील मंगल कार्यासाठी सोनं घ्यायचं असेल, तर आजचे हे घसरलेले दर नक्कीच दिलासा देणारे आहेत.

Leave a Comment