Centenarians in Japan 2025 : नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला असं रहस्य सांगणार आहोत जे ऐकून तुम्ही देखील थक्का व्हाल ! जपान हा देश दीर्घकालीन लोकांचा आहे असं आपल्या कानावर आल आहे. जगातील दीर्घायुष्य नागरिक म्हटलं की सर्वात आधी जपान देश समोर येतो. याचा मुख्य कारण म्हणजे या देशांमध्ये सेंचुरी मारलेले म्हणजेच वयाची शंभरी ओलांडलेले नागरिकांची आकडेवारी समोर आली आहे आणि ही थक्क करणारी आहे.
जपान सरकारने नुकताच एक अहवाल जारी केला आहे, या अहवालानुसार सप्टेंबर महिन्यापर्यंत जवळपास 99 हजार 763 नागरिकांनी वयाची शंभरी पार केली आहे काही दिवसांमध्ये हा आकडा एक लाखाचे वर जाणार असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.
55 वर्षाचा विक्रम सुरूच :
ही केवळ एक संख्या नाही तर, संपूर्ण जगासाठी एक आश्चर्यचकित करणारा विषय आहे. कारण जपान सलग 55 वर्षापासून शतक वीरांचा विक्रम राखून ठेवणारा हा एकमेव देश आहे. इतकी मोठी दीर्घायुष्य मंडळी जगात दुसरीकडे कोठे सापडणार नाही यामुळे जपान देशाला दीर्घकालीन आयुष्य असणाऱ्या लोकांचा देश देखील म्हटले जात आहे.

महिला येथे पण आघाडीवर !
संपूर्ण जगामध्ये लेडीज फर्स्ट असा नारा आहे, या आकडेवारी मध्ये देखील सर्वात लक्षणीय गोष्ट म्हणजे, 88% महिला या 100 वर्षावरील आहेत. महिलाचा आयुष्य पुरुषांच्या तुलनेने जास्त असते हे आपण नेहमी ऐकतो पण जपानमध्ये हा फरक प्रचंड तुम्हाला दिसून येत आहे. जवळपास 99 हजाराच्या जवळ पोहोचलेल्या शंभरी वीरापैकी जवळपास 88 हजार महिला आहेत हे पाहून आश्चर्य वाटेल की तिथल्या स्त्रिया इतक्या जास्त काळ का जिवंत राहतात? जर तुम्हाला याचे उत्तर सांगायचं झालं तर जपानी जीवनशैली आहार आणि शिस्त यामध्ये दडलेले आहेत.

संपूर्ण जगातील सर्वाधिक वयस्कर नागरिक ?
तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या जगामध्ये नेमकं सर्वाधिक वयाची व्यक्ती कोण आहे आणि कोणत्या देशामध्ये आहे ? सध्या जपानच्या जवळ राहणाऱ्या “शिगेको कागावा” या 114 वर्षाच्या आजी जगातील सर्वाधिक वयस्कर व्यक्ती म्हणून नोंदल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर जपान मधील किनाऱ्यावरील युवा का शहरातील किंवाटाका मिझोन हे 111 वर्षाचे आजोबा सर्वात वयस्कर पुरुष मानले जात आहे हे आकडे केवळ इतिहास नोंदवण्यासाठी नाही तर जगाला एक वेगळा संदेश देणारे आहेत ज्यामध्ये यांची जीवनशैली यांचं जेवण अशा सर्व गोष्टी येतात.

जपानमध्ये प्रत्येक वर्षी 15 सप्टेंबरला ज्येष्ठ नागरिक दिन हा साजरा केला जातो या दिवशी राष्ट्रीय सुट्टी देखील असते आणि समाजाने जेष्ठ बद्दल आपली भावना व्यक्त करतात ही परंपरा जपान मध्ये आहे. यावर्षी तब्बल 52 हजार 310 100 ओलांडलेल्या नागरिकांचा पंतप्रधान च्या हस्ते रोपे चषक आणि सन्मानपत्रक देऊन सन्मान करण्यात आला आहे.
आरोग्य मंत्री टाकामारो फुकोका यांनी नुकते जाहीर केले आहे की शंभरी ओलांडलेल्या 87 हजार 784 महिला आणि 11989 पुरुषांचे दीर्घायुष्य बद्दल अभिनंदन करण्यात आले आहे मंत्री म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांनी समाजासाठी जे योगदान दिले आहे त्याबद्दल आम्ही कायम तुमची आभारी राहो.
जपान मधील लोकांची दीर्घायुष्य का ?
मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत हा लेख वाचून असा प्रश्न पडला असेल की या देशांमध्ये लोक एवढे वर्ष कसे जिवंत राहतात ? मित्रांनो हा प्रश्न तुम्हालाच नाहीतर संपूर्ण जगाला देखील पडलेला आहे या प्रश्नाचे उत्तर अनेकांनी शोधले आहे यामध्ये संशोधक सांगतात की जपानमध्ये हजायविकार आणि कॅन्सर मुळे मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. विशेषता स्तनांचा कर्करोग आणि प्रोसिस्ट कॅन्सर या दोन आजाराचा प्रमाण जगाच्या तुलनेने खूपच कमी आहे.

या मागचे मोठे कारण म्हणजे ;
- आहारामध्ये रेड मीट कमी आणि मासे व भाज्यांचा जास्त वापर.
- स्थूलतेतच कमी प्रमाण
- महिलांमध्ये लठ्ठपणाचा प्रमाण जवळपास नाहीसा
- याच कारणामुळे महिलाचा विषय पुरुषांच्या तुलनेमध्ये जास्त आहे
चांगल्या जीवनशैलीचा प्रचार देणारा देश
जपानी सरकारने वर्षानुवर्षी मीठ आणि साखर कमी खा हा संदेश पसरवला आहे . लोकांनी तो स्वीकारला देखील परिणामी तिथे उच्च रक्तदाब आणि हदविकाराचे प्रमाण खूप कमी आहे. याशिवाय जपानमध्ये वयोवृद्ध लोक सुद्धा अत्यंत सक्रिय जीवनशैली जगतात, अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत जपानी वृद्ध जास्त चालतात सर्वजनिक वाहतूक वापरतात आणि दैनंदिन कामात सक्रिय राहतात.

रेडिओ ताईसो नावाचा तीन मिनिटाचा सामूहिक व्यायाम 1928 पासून जपानी संस्कृतीचा एक भाग आहे. आज देखील हा व्यायाम गटा गटांनी टीव्हीवरून किंवा सार्वजनिक ठिकाणी केला जातो यामुळे वृद्धांमध्ये सामाजिक बांधिलकी टिकून राहते आणि शरीर देखील मजबूत राहते.
जगाला देणारा संदेश कोणता ?
जपानमध्ये शंभरी पार करणाऱ्यांची संख्या लाखावर पोहोचणे ही केवळ बातमी नाहीतर संपूर्ण जगासाठी एक धडा आहे. आहार, शिस्तबद्ध जीवनशैली आणि समाजाबद्दलची जबाबदारी यामुळे आयुष्य लांबवता येतं. तुझं सरकार नोंदवही अचूक ठेवून वृद्धांची काळजी घेणे आणि त्याचा योगदान दाखवणे हे देखील तेवढेच महत्त्वाचा आहे. यामधून इतर देशांना देखील एक संदेश मिळतो की व्यवस्थित आहार व्यायाम सर्वकाही असेल तर जीवन दीर्घकालीन राहत.
