Agriculture news farmer advice : राज्यात सध्या सुरू असलेलं बदलतं हवामान हे फक्त पिकांसाठीच नाही तर जनावरांसाठीही मोठं संकट बनताना दिसतंय. कालपर्यंत उन्हाचा तडाखा सहन करणाऱ्या जनावरांवर आज अचानक गारपीट, वादळी वारे आणि पावसाचा मारा सुरू झालाय आणि या बदलत्या परिस्थितीत सर्वात जास्त फटका बसतो तो बळीराजाच्या जनावरांना. कारण शेतकरी दिवसभर पिकाच्या काळजीत असतो, पण या अचानक आलेल्या पावसात जनावरांची योग्य काळजी घेतली नाही, तर एका रात्रीत मोठं नुकसान होऊ शकतं आणि हाच इशारा तज्ज्ञांकडून देण्यात येतोय. Agriculture news farmer advice
उन्हाळ्यात कोणते पीक घ्यावे? कमी पाण्यात, जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांची खरी माहिती
लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील पशुधन तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाचा अंदाज मिळताच जनावरांची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. कारण गारपीट किंवा विजांचा कडकडाट असताना जनावरं जर मोकळ्या जागेत असतील, झाडाखाली बांधलेली असतील किंवा चरायला सोडलेली असतील, तर त्यांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. अनेक वेळा शेतकरी जनावरं बाहेरच ठेवतो आणि अचानक पाऊस सुरू होतो अशावेळी घाईगडबडीत काहीही सुचत नाही आणि नुकसान होऊन बसतं.
सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवामानाचा अंदाज रोज तपासणं. मोबाईलवर आलेला साधा मेसेजही दुर्लक्षित करू नका कारण तोच तुमच्या जनावरांचा जीव वाचवू शकतो. पावसाचा इशारा मिळताच लगेच चरायला गेलेली जनावरं घरी आणा. विशेष म्हणजे बैल, गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या यांना झाडाखाली कधीही बांधू नका कारण विजा पडण्याचं प्रमाण झाडांवर जास्त असतं आणि अनेक वेळा अशा दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळालं आहे.
हे पण वाचा : शेतीची नांगरट कधी करावी? योग्य वेळ ओळखा, उत्पादन दुप्पट वाढवा
वादळी वाऱ्यासह पाऊस आला की सगळ्यात आधी उडून जातात ते म्हणजे गोठ्याचे पत्रे आणि हीच गोष्ट मोठा धोका निर्माण करते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच गोठा मजबूत करून ठेवणं गरजेचं आहे. शक्य असल्यास जनावरांना भक्कम शेडमध्ये, सुरक्षित निवाऱ्याखाली हलवा. काही शेतकरी अजूनही तात्पुरत्या शेडमध्ये जनावरं ठेवतात, पण सध्याच्या हवामानात ते खूप धोकादायक ठरू शकतं.
पावसाचं पाणी गोठ्यात शिरणं ही देखील मोठी समस्या आहे. गोठा ओला झाला की जनावरं आजारी पडतात, त्यांच्या अंगावर जंतू वाढतात आणि दूध देणाऱ्या जनावरांमध्ये कासदाहसारखे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे गोठ्याच्या बाजूने ताडपत्री लावून पाणी आत येणार नाही याची काळजी घ्या. गोठा कोरडा राहणं हीच जनावरांच्या आरोग्याची पहिली पायरी आहे.
उन्हाळा आणि पाऊस या दोन्हींचा परिणाम जनावरांवर होतो. त्यामुळे त्यांना वेळेवर पाणी पाजणं खूप महत्त्वाचं आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन वेळा पाणी दिलं तर जनावरं तंदुरुस्त राहतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जनावरांना चरायला सोडू नका, कारण या वेळेत उष्णता आणि अचानक हवामान बदल यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो.
नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का? चेक करा लगेच
गोठ्याची स्वच्छता हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याकडे अनेक वेळा दुर्लक्ष होतं. पावसामुळे ओलसरपणा वाढतो आणि त्यामुळे गोचीड, डास, माश्या यांचा प्रादुर्भाव वाढतो. हे जंतू जनावरांच्या अंगावर बसून विविध आजार पसरवतात. त्यामुळे गोठा स्वच्छ ठेवणं, पाणी साचू न देणं आणि आवश्यक असल्यास कीटकनाशकांची फवारणी करणं खूप गरजेचं आहे. काही तज्ज्ञ तर सांगतात की, गोठ्यात चुन्याची पावडर टाकल्याने ओलसरपणा कमी होतो आणि वातावरण स्वच्छ राहतं.
दुधाळ जनावरांसाठी तर अधिक काळजी घ्यावी लागते. पावसानंतर दूध काढण्याआधी आणि नंतर कास स्वच्छ धुणं अत्यंत आवश्यक आहे. पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्याने स्वच्छता केल्यास संसर्ग टाळता येतो. अन्यथा गोठ्यातील अस्वच्छतेमुळे कासदाहसारखे गंभीर आजार होऊ शकतात आणि दूध उत्पादन कमी होऊ शकतं.
लसीकरण हा अजून एक महत्त्वाचा भाग आहे. लाळ्या-खुरकूत रोग, आंत्रविषार यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी वेळेवर लसीकरण करणं आवश्यक आहे. विशेषतः शेळ्या-मेंढ्यांमध्ये पावसाळ्यात पोटाचे विकार वाढतात, त्यामुळे त्यांना नदी-नाल्याजवळ चरायला सोडू नका. कारण तिथे दूषित पाणी आणि जंतूंचा धोका जास्त असतो.
एकूण पाहता, सध्या हवामानाचा अंदाज लावणं कठीण झालं आहे. कधी ऊन, कधी पाऊस, कधी गारपीट या सगळ्या परिस्थितीत शेतकरी आणि त्याची जनावरं दोघंही संकटात सापडले आहेत. पण थोडी काळजी, योग्य नियोजन आणि वेळेवर घेतलेले निर्णय हेच या संकटातून वाचवू शकतात.
शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेव पिकं वाचवणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच जनावरं वाचवणंही गरजेचं आहे. कारण शेतकऱ्याचं खरं बळ हे त्याच्या शेतात नाही, तर त्याच्या गोठ्यात उभं असतं आणि ते बळ सुरक्षित ठेवणं आजच्या काळात सगळ्यात मोठी गरज बनली आहे.
हे पण वाचा : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कृषी यांत्रिकीकारणासाठी 150 कोटींचा निधी; या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार तुमचे नाव आहे का?
