WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! लवकरच खात्यामध्ये 128 कोटी रुपये जमा होणार, परंतु तुम्हाला मिळणार का चेक करा ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture Grants News | राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आणि त्याचा सर्वात मोठा फटका बसला तो आपल्या शेतकऱ्यांना कुठे कांद्याचं नुकसान, कुठे द्राक्ष बागा पडल्या, तर कुठे उभं पिक वाऱ्याने जमिनीवर आडवं झालं अशा कठीण परिस्थितीत आता थोडासा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल १२८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे, पण गावाकडच्या बळीराजाच्या मनात अजूनही एकच प्रश्न आहे पैसे खात्यात नेमके कधी येणार? Agriculture Grants News

मंत्रिमंडळ बैठकीत या मदतीचा निर्णय घेण्यात आला आणि मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही माहिती अधिकृतपणे जाहीर झाली. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात जवळपास १ लाख १४ हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं होतं. ही संख्या फक्त आकड्यांमध्ये दिसते, पण प्रत्यक्षात पाहिलं तर प्रत्येक हेक्टर मागे एका शेतकऱ्याचं वर्षभराचं स्वप्न उभं असतं आणि तेच स्वप्न पावसाने एका रात्रीत उद्ध्वस्त केलं.

या काळात तब्बल १ लाख ८० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या संकटाचा फटका बसला. चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचं मोठं नुकसान झालं. सरकारने आता १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत जाहीर केली असली तरी अनेक ठिकाणी शेतकरी अजूनही पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत… काही ठिकाणी तर नुकसान झाल्यानंतर महिनाभरानंतर अधिकारी पोहोचले, अशीही परिस्थिती दिसून आली.

जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीतही परिस्थिती फार वेगळी नव्हती. पुन्हा एकदा अवकाळी पावसाने थैमान घातलं आणि तब्बल १ लाख ४५ हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं. यामध्ये २ लाख ३३ हजार शेतकरी बाधित झाले. केळी, कांदा, द्राक्ष, गहू, हरभरा, ज्वारी, आंबा, पपई अशा विविध पिकांवर या पावसाचा मोठा परिणाम झाला. गावाकडच्या शेतकऱ्यांच्या भाषेत सांगायचं तर पिकं तयार झाली होती, फक्त बाजारात न्यायची बाकी होती आणि तेवढ्यात सगळं गेलं

लातूर, सोलापूर, पुणे, सातारा, नाशिक, यवतमाळ, जालना, बीड, बुलढाणा अशा अनेक जिल्ह्यांमध्ये या अवकाळी पावसाने कहर केला. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटामुळे जनावरांचाही मृत्यू झाला, तर काही ठिकाणी शेतात काम करताना अपघातही घडले.

या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेली मदत महत्त्वाची असली तरी ती वेळेत मिळणं हेच खरं आव्हान आहे. एप्रिल महिन्यातही पावसाने पाठ सोडलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार १ लाख ९४ हजार शेतकऱ्यांचं पुन्हा नुकसान झालं आहे आणि १ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. म्हणजेच संकट अजून पूर्णपणे टळलेलं नाही उलट बळीराजा अजूनही निसर्गाच्या दयेवर आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून पंचनाम्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. पण गावोगाव शेतकरी सांगत आहेत की, साहेब आले, फोटो काढले आणि गेले… पण त्यानंतर काहीच झालं नाही त्यामुळे केवळ घोषणा करून उपयोग नाही, तर प्रत्यक्षात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणे गरजेचे आहे.

सरकारने सांगितलं आहे की, ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. पण यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे पुढील १० ते १५ दिवसात काही टप्प्यांमध्ये ही रक्कम जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत तारीख अजून स्पष्ट करण्यात आलेली नाही.

दरम्यान, जलसंपदा विभागाकडूनही मोठी माहिती समोर आली आहे. राज्यात जुलै २०२२ पासून आतापर्यंत ४१ प्रकल्प पूर्ण झाले असून यामुळे १०५ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे. यामुळे २.९५ लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा मिळणार आहे. भविष्यात अशा संकटांवर मात करण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत.

एकूणच पाहिलं तर सरकारने मदत जाहीर केली आहे, पण शेतकऱ्यांसाठी खरी परीक्षा अजून बाकी आहे कारण त्याला आता पैशांची गरज आज आहे उद्या नाही. बँकेचा मेसेज कधी येतो, खात्यात पैसे कधी जमा होतात याकडे बळीराजा डोळे लावून बसला आहे आणि प्रत्येक गावात एकच चर्चा ऐकायला मिळते यावेळी तरी पैसे वेळेत मिळतील का?

Leave a Comment