Agriculture Compensation News : राज्यातील परिस्थिती पाहता सध्या अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवरती मोठा संकटाचा काळ कोसळलेला आहे शेतीची अतोनात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलेलं आहे. पार्श्वभूमी वरती शासनाने आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी युद्धपातळीवरती शेतीचे नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे सुरू केलेले आहे. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे. Agriculture Compensation News
खरंतर राज्यात गेल्या ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात मोठा अतिवृष्टी सारखा पाऊस पडला यात पावसाने राज्यातील तब्ब 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरड मोडलं. काही ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहेत शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेले आहे. राज्यातील नांदेड पासून साताऱ्यापर्यंत आणि विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा सर्वात भागात मुसळधार पावसाने खरीप हंगामातील वायाला गेलेला आहे. आणि शेतकरी पुन्हा एका मोठ्या संकटात सापडला. या सगळ्या पार्श्वभूमी वरती राज्याचे कृषिमंत्री यांनी स्पष्ट केलं की शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे आणि पंचनामाचे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ नुकसान झाल आहे याची कल्पना देणारा आकडा म्हणजे तब्बल 17 लाख 85000 हेक्टर क्षेत्र या पावसामुळे बाधित झाल आहे. एवढ्या प्रचंड जमिनीवर उभं असलेलं सोयाबीन, कापूस, मका, तुर, उडीद, मुग, भाजीपाला, फळपिक, ऊस, कांदा, बाजरी, ज्वारी, हळद यांच नुकसान झाला आहे. खरंतर यावर्षी सोयाबीन आणि कापूस यावर शेतकऱ्यांचा डोळा होता पण याच पावसाने शेतकऱ्यांचा सगळा हिशोब मोडून काढला. मायबाप सरकार आमच्याकडे लक्ष द्या आम्ही कसं जगावं? कसं पोट भराव? असा प्रश्न सरकार समोर मांडला आहे.
यामध्ये सर्वाधिक फटका बसलेले जिल्हे म्हणजे नांदेड, वाशिम, यवतमाळ, धाराशिव, अकोला, बुलढाणा, सोलापूर आणि मराठवाड्या विदर्भ इतर जिल्हे उदाहरणार्थ नांदेड जिल्ह्यातील तब्बल सात लाख 27 हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेल आहे. वाशिम, यवतमाळ, अकोला, धाराशिव या भागात लाखोंच्या एकटाळामध्ये पिक पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. शेतात उभ्या पिकांवर मुसळधार पावसाचा तडाका बसला, काही ठिकाणी नदी नाले वाहून गेले, भाजीपाला कुजला, फळबागा उध्वस्त झाल्या, ऊस आडवा पडला.

कृषिमंत्री भरणे यांनी सांगितलं की काही जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून तिथल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उर्वरित ठिकाणी अधिकारी पंचनामे करतील सरकार शेतकऱ्यांना आरक्षण मदत देण्यासाठी ठस पावला उचलत असून कोणतेही शेतकरी संकटात एकटा राहणार नाही, असा आश्वासन त्यांनी दिल.
आज ग्रामीण भागात शेतकरी मात्र काळजीत आहे. त्यांच्या डोक्यावरती कर्जाचे वजन पीक गेल्याने हातात पैसा नाही, आणि घर खर्च कसा भागवायचा हा प्रश्न आहे. गावोगावी शेतकरी मंडळी पावसाकडे डोळे लावून बसली होती की यंदा तरी पीक दणकट होतील, पण अदृष्टीने त्यांच्या आशा पाण्यात गेल्या.
या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळावी एवढेच त्यांच्या मनात आहे. कारण खरीप हंगाम गेला, आता पुढचं पेरणी किंवा रब्बी हंगाम हत्ती घ्यायचं तर थोडा आधार हवा. शासनाकडून मदत तातडीने मिळाली तर शेतकरी पुन्हा उभा राहील, अन्यथा ही आपत्ती शेतकऱ्यांच्या कुटुंबाला खोल संकटात ढकलून देईल.
