ADAS Cars in India 2025 | भारतीय बाजारात कार खरेदी करण्याची संख्या दिवसान दिवस वाढत आहे. लोक आता फक्त किमतीकडे बघत नाही तर सुरक्षिते कडे ही जास्त लक्ष देत आहेत आपल्या परिवाराच्या जीवनाची किंमत पैसे पेक्षा जास्त जास्त आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. म्हणूनच आता कंपन्या एक पाऊल पुढे टाकत आहेत आणि कारमध्ये एडीएस ( Advanced Driver Assistance System) यासारखी आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा देत आहेत. शेतकरी असो किंवा नोकरदार वर्ग असो कार घेताना आता सेफ्टी फर्स्ट हात विचार सर्वांच्या डोक्यामध्ये येतो.
हे पण वाचा | GST बदलाचा मोठा फायदा , मारुती सुझुकीच्या या भन्नाट कार्स घेणार बाजारात एन्ट्री
मारुती सुझुकी विक्टोरियास :

ही गाडी नुकतीच बाजारात दाखल झाली आहे आणि ही मारुतीच्या लाईन अप मधील पहिली ए डी एस असलेली कार आहे. लोकांना नेहमी वाटायचं की मारुती म्हणजे फक्त मायलेज पण आता सुरक्षितेकडेही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. 1.5 लिटर k 15c माइल्ड-हायब्रिड इंजिनसह ZXi+ AT ट्रिममध्ये मिळवणारी ही कार 17.19 लाखापासून सुरू होत आहे.
हुंडाई क्रेटा :

ही गाडी आधीपासूनच लोकांच्या पसंतीची कार आहे. मध्यम आकाराच्या एसयू मध्ये सर्वाधिक विक्री होणारी ही गाडी आता एडीएस तंत्रज्ञानासह येत आहे. या सुविधेमुळे आता सुरक्षा आणि आराम मिळणार आहे, 15.69 लाखापासून सुरू होणारे या कारच्या किमती पाहून अनेक कुटुंब शहरात आणि गावाकडेही घेण्याचं ठरवतात.
हे पण वाचा | GST बदलाचा मोठा फायदा , मारुती सुझुकीच्या या भन्नाट कार्स घेणार बाजारात एन्ट्री
महिंद्रा XUV 700 :

या गाडीबद्दल बोलायचं झालं तर ही SUV 2021 पासूनच लोकांच्या मनात घर करून बसलेली आहे. महिंद्रा ने पहिल्यांदा भारतीय बाजारात एडीएस आणलं आणि लोकांमध्ये सुरक्षित प्रवासाचा एक नवा विश्वास निर्माण केला आहे. AX 7 आणि AX 7L या टॉप वेरियडमध्ये हे तंत्रज्ञान मिळत आहे, आणि त्याची किंमत 18.37 लाखापासून सुरू होते . रोज ऑफिसला जाणाऱ्या नोकरदारापासून ते आठवड्याचा शेवट लांब पडल्याचा प्रवासाला जाणाऱ्या कुटुंबापर्यंत सगळ्यांसाठी ही गाडी एकदम चांगली राहणार आहे.
टाटा हॅरियर :

आता या गाडीमध्ये तुम्हाला एडीएस फीचर्स मिळणार आहेत. एडवेंचर एक्स प्लस आणि फियरलेस प्लस + ट्रिममध्ये हे फीचर्स मिळतात, 2.0 लिटर क्रायोटेक डिझेल इंजिनसह 170 एचपीची ताकद असलेली ही SUV म्हणजे डोंगराळ भागातून, खराब रस्त्यांतून प्रवास करणाऱ्यांसाठी सुरक्षित आणि दमदार पर्याय आहे. 18.30 लाखांपासून सुरू होणारी ही कार आता गावाकडच्या अनेक तरुणांचं स्वप्न बनली आहे.
Disclaimer |
या लेखात दिलेली कार ची किंमत फीचर्स आणि माहिती ही अधिकृत वेबसाईट आणि उपलब्ध अहवालावर आधारित आहे. वेळोवेळी कंपन्याकडून यामध्ये बदल होऊ शकतात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित कंपनीचे अधिकृत शोरूम मध्ये जाऊन तपासणी करावी. इथे दिलेली माहिती फक्त सामान्य वादकांसाठी आहे.
हे पण वाचा | GST बदलाचा मोठा फायदा , मारुती सुझुकीच्या या भन्नाट कार्स घेणार बाजारात एन्ट्री
