WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहिण योजनेमध्ये नवा मोठा बदल! आता लाभ घ्यायचा असेल तर E– kyc करावी लागणार आहे 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin e-KYC 2025 : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही खूप चर्चेमध्ये आहे. ग्रामीण भागात असो किंवा शहरी प्रत्येक घरामध्ये या योजनेबद्दल चर्चा सुरू असते लाखो महिलांना या योजने अंतर्गत 1500 हजार रुपयांचा हप्ता थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातो. 

Ladki Bahin e-KYC 2025
Ladki Bahin e-KYC 2025

परंतु आता या योजनेमध्ये सरकारने एक महत्त्वाचा बदल केला आहे, काही अपात्र महिलांनी चुकीने किंवा गैरफायदा घेऊन या योजनेचा लाभ घेतला आहे त्यामुळे आता पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने ही ई केवायसी प्रक्रिया राबवली आहे, याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. 

आदिती तटकरे काय म्हणाल्या ? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता  याला सर्वोच्च प्रधान्य आहे. त्यामुळे या योजनेतील सर्व लाभार्थी महिलांनी पुढील दोन महिन्यात आपली इ केवायसी  E – kyc पूर्ण  करून घ्यायची आहे. यासाठी लाडकी बहीण वेब पोर्टलवर खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

Ladki Bahin e-KYC 2025
Ladki Bahin e-KYC 2025

 आजची तटकरे यांनी अजून देखील माहिती दिली आहे, त्या म्हणाल्या की ही प्रक्रिया जास्त अवघड नाही उलट सहज सोपी आणि पारदर्शक आहे. भविष्यातील शासकीय योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर ही केवायसी प्रक्रिया उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी वेळ न वाया घालता आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. 

ई – केवायसी प्रक्रिया कशी करावी ? 

आता अनेक महिलांमध्ये एक प्रश्न निर्माण झाला आहे , नेमकं केवायसी प्रोसेस कशी करावी ? तर यासाठी सरकारने ऑनलाईन पद्धत राबवली आहे. 

  • सर्वात आधी पात्र लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेचे अधिकृत पोर्टलवर लॉगिन करायचे आहे. 
  • त्यानंतर आता आपली माहिती, जसे की नाव पत्ता मोबाईल नंबर योग्य भरायचा आहे. 
  • आता महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करायची आहे, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, अशी डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायची आहे. 
  • ही सर्व माहिती भरून सबमिट केल्यावर तुमची केवायसी पूर्ण होणार आहे.

ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही तुमच्या घरी बसून देखील तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. 

Ladki Bahin e-KYC 2025
Ladki Bahin e-KYC 2025

जर ई –केवायसी केली नाही तर काय होणार ? 

आता अनेक महिलांमध्ये असा देखील प्रश्न निर्माण झाला असेल की जर केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर काय होणार ? तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे सरकारने स्पष्ट केला आहे की जर केवायसी प्रक्रिया केली नाही तर महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, म्हणजेच तुम्हाला दर महिन्याला येणारा 1500 रुपयांचा हप्ता बंद होणार आहे. 

या योजनेत आधी स्पष्ट केले होते की केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे पण आता केवायसी अनिवार्य केल्यामुळे आता खरी गरज असलेल्या महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे. त्यामुळे ज्या बहिणी अजून थोड्या हलगर्जीपणे वागताय त्यांना सरकारचा आव्हान आहे की वेळ वाया न घालता लवकरात लवकर आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

केवायसी प्रक्रिया का अनिवार्य ? 

आजच्या या डिजिटल युगामध्ये पारदर्शकता आणि विश्वास हा मोठा एक मुद्दा आहे. सरकार जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांना थेट आर्थिक मदत करतो तेव्हा अपात्र लोकांनी फायदा घेऊ नये अशी काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आपण पाहिलं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांनी पात्र नसताना देखील या योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांना आता केवायसी प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होणार आहे. 

  • ई केवायसी मुळे डुबलीकेट लाभार्थी बंद होणार. 
  • ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांपर्यंत मदत पोहोचणार. 
  • भविष्यातील इतर योजना जोडायला सोपी जाईल. 

ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंब वर्गातील महिलांना या योजनेचा खूप फायदा झाला आहे. या महिला म्हणत्यात की या पैशामुळे आमच्या संसारात किराणा आणायला सोपं झालं त्याचबरोबर मुलांच्या शाळेचा देखील खर्च भागत आहे. सरकारना योजना सुरू केली हे खरच कौतुक स्पर्धा आहे पण आता ही नवी आठ पूर्ण करावी लागणार आहे. 

Ladki Bahin e-KYC 2025
Ladki Bahin e-KYC 2025

ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्याची मुदत ! 

सरकारने या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्याची मुदत दिली आहे. म्हणजेच सप्टेंबर पासून पुढे दोन महिने सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. पण शेवटच्या क्षणापर्यंत  जर तुम्ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमच्यासाठी धोकादाय करू शकतो.  कारण की शेवटचे काही दिवस सोडले की आपण पाहतो की अनेक वेबसाईट ही डाऊन चालतात त्यामुळे तुम्ही वेळ वाया न घालता लवकरात लवकर आपली केव्हाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

Leave a Comment

error: Content is protected !!