WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल; या अकरा जिल्ह्यांना पावसाचा मोठा इशारा तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Monsoon Update 2026 | महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. एकीकडे काही भागात तीव्र उष्णताची लाट सुरू आहे तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. यामुळे शेतकरी सह नागरिकांना देखील हा हवामान अंदाज जाणून घेणे खूप गरजेचे आहे. कारण हवामान विभागाने 5 मे रोजी राज्यातील 11 जिल्ह्यांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला असून विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. Maharashtra Monsoon Update 2026

कुठे पडणार पाऊस ?

हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार, विदर्भातील अनेक ठिकाणी पुढील 24 तासात वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमी वरती अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेस हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपुर गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या भागांमध्ये जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट तसेच मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे

उष्णतेचा तडाका कायम

राज्यातील काही भागांमध्ये अजून देखील उष्णतेची लाट कायम आहे. विदर्भात तापमान 41 ते 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असून त्यामुळे नागरिकांना उष्णताचा धोका वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्र मध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर येथे देखील तापमान 37 ते 40 दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

कोकणात दमट वातावरण

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार आहे. इथे तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहील मात्र पावसाची शक्यता कमी आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागने नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वादळाच्या वेळी घरभर जाणे टाळावे, विजांच्या कडकडाट वेळी सुरक्षित ठिकाणी थांब, झाडाखाली उभा राहू नका, उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पाणी अधिक प्या, शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित ठेवावीत.

तर पुढे हवामान तज्ञांच्या मते मे महिन्यात अशा प्रकारे बदल सामान्य असले तरी यंदा उष्णता आणि पावसाचे प्रमाण एकाच वेळी दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. पुढील काही दिवसात हवामान आणखी बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही भागात पावसाचा जोर वाढू शकतो तर काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहील.

हे पण वाचा : विजांपासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबू नका! पंजाबराव डख यांचा कडक सल्ला; अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार!

Leave a Comment