WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्याच्या वातावरणाबाबत हवामान खात्याचा पुन्हा एकदा मोठ्या इशारा? या जिल्ह्यांना महत्त्वाचे संदेश

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Forecast : गेले काही दिवसांपासून राज्यातील वातावरण खरंचच वेगळंच पाहायला मिळत आहे. कधी अचानक पाऊस तर कधी कडाक्याचे ऊन अशाच वातावरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून, ही अपडेट सर्वांना चिंता लावणारी ठरणार आहे. राज्याच्या वातावरणाबाबत बोलायचे झाल्यास राज्यात पावसाने अनेक गारपिटीने शेतकऱ्यांसह नागरिकांना देखील हैराण करून सोडले होते. काही ठिकाणी जनावरांसाठी त्रासदायक परिस्थिती देखील निर्माण झाली होती परंतु आता हे सगळं थांबला आहे परंतु आता पुन्हा एकदा लाहीलाही करणारा उन्हाचा तडाका बसण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत हवामान खात्याने दिलेला इशारानुसार पुढील काही दिवस ठाणे मुंबई पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना मोठा इशारा दिला असून येथे उष्णतेची लाट येणार असा देखील इशारा देण्यात आलेला आहे. Maharashtra Weather Forecast

सध्याच्या घडीला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काल पाऊस आज ऊन आणि उद्या अंग भाजणार अशी परिस्थिती तयार झाली आहे. शेतकरी अजूनही गारपिटीचे नुकसानीतून बाहेर निघत नाहीत यावरच नवीन संकट उभा राहिलेला आहे कारण पाऊस थांबल्यानंतर जमिनीत ओलावा पटकन आटतो आणि उष्णता वाढली की पिकांवर ताण येतो. त्यामुळे आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक दुहेरी अडचण निर्माण झाले आहे.

हे पण वाचा | शेतीची नांगरट कधी करावी? योग्य वेळ ओळखा, उत्पादन दुप्पट वाढवा

हवामान तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून सक्रिय असलेला वेस्टर्न डिस्टरबेंस आता ओसरत चालला आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी झाला आहे. पण त्याचवेळी वाऱ्याची दिशा बदलत असून उत्तर-पश्चिमेकडून गरम वारे वाहू लागले आहेत. याचा थेट परिणाम तापमानावर होणार आहे. एप्रिल महिना सुरू असताना मे महिन्यासारखा उकाडा जाणवणार आहे, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, कोकण किनारपट्टी भागात उष्णता जास्त जाणवणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये हवामान कोरडं राहील, पण आर्द्रता जास्त असल्यामुळे उकाडा अधिकच त्रासदायक होईल. म्हणजे तापमान फक्त आकड्यांमध्ये नसतं, तर अंगावर येणारा चिकट उकाडा लोकांना जास्त हैराण करतो. त्यामुळे दुपारी 11 ते 4 या वेळेत बाहेर पडणं टाळा, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

शहरात राहणारे लोक तरी घरात AC, फॅन वापरून थोडंफार सांभाळून घेतात, पण गावाकडच्या शेतकऱ्यांसाठी ही वेळ सर्वात कठीण असते. उन्हाच्या कडकडीत तापमानात शेतात काम करावं लागतं, जनावरांची काळजी घ्यावी लागते. एका शेतकऱ्याने सांगितलं पावसाने नुकसान केलं, आता उन्हाने करपवणार शेती करायची तरी कशी? हीच अवस्था अनेकांची आहे.

हे पण वाचा | राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी! पंजाबरावांनी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिला मोठा इशारा

विदर्भ, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या भागातही हवामान कोरडं राहणार असून तापमान 40 अंशांच्या वर जाण्याची शक्यता आहे. म्हणजे संपूर्ण देशातच उष्णतेचा तडाखा वाढताना दिसतोय. पुढील 48 तास ही उष्णता कायम राहणार आहे, त्यानंतर थोडासा दिलासा मिळू शकतो, पण सध्या तरी परिस्थिती गंभीरच आहे.

हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, प्री-मान्सून (Pre-monsoon) हालचालींमध्ये सध्या खंड पडणार आहे. म्हणजेच अचानक पाऊस पडण्याची शक्यता कमी झाली आहे आणि उन्हाचा प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

या पार्श्वभूमीवर काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे दुपारी उन्हात बाहेर पडणं टाळा, पाणी भरपूर प्या डोक्यावर कापड किंवा टोपी वापरा, आणि शक्यतो सावलीत राहा. शेतकऱ्यांनी जनावरांना पाणी आणि सावलीची व्यवस्था करावी तसेच काढणीस आलेली पिकं सुरक्षित ठेवावीत.

एकंदरीत कालपर्यंत पावसाने घाबरवलेलं महाराष्ट्र आता उन्हाच्या झळांनी हैराण होणार आहे. निसर्गाचं हे बदलतं रूप पाहून प्रत्येकजण थोडासा चिंतेत आहे. पण योग्य काळजी घेतली तर या उष्णतेच्या लाटेपासून मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. सध्या तरी एकच वाक्य सगळीकडे ऐकू येतंय घरात राहा, नाहीतर उन्हात भाजाल.

हे पण वाचा: Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात 19 जिल्ह्यात पावसाचे अलर्ट ! राज्यात शाळा कॉलेज बंद 

Leave a Comment