Maharashtra Latest Weather Forecast : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसासाठी पोषक वादावरण तयार झालेला आहे. परंतु हा पाऊस शेतकऱ्यांचा नक्की नुकसान करून जाणार हे देखील गोष्ट नक्की खरी. कारण सध्या सगळीकडेच रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे गहू, हरभरा, ज्वारी उन्हाळी बाजरी या प्रकारचे पिके जमात आली असून अशातच हा अवकाळी पावसाचा फाटक्या शेतकऱ्यांना नक्कीच संकटात टाकून जाणार आहे. अशातच एक मोठी अपडेट समोर आली असून राज्याच्या वातावरणाबाबत हवामान विभागाने मोठी अपडेट दिलेली आहे. चला तर जाणून घेऊया नवीन अपडेट काय आणि कुठे हा अवकाळी पाऊस पडणार आहे. Maharashtra Latest Weather Forecast
आजचा हवामान अंदाज काय?
सध्या एकीकडे उन्हाचा तडाका वाढत असून, दुसरीकडेच हवामान आहे पुन्हा एकदा पलटी घेतली आहे. सकाळी उन्हाचा कडाका आणि दुपारी अंगावर अंगावर येणारा उखाडा आणि सायंकाळी अचानक पावसासाठी वातावरण तयार होणारी पावसासाठी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशाच परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी पुढील काही तास खूप महत्त्वाचे ठरणार असण्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यावर एकेकाळी दोन संकट येताना दिसत आहेत एकीकडे उष्णतेची लाट, तर दुसरीकडे काही भागात वादळी पावसाची शक्यता.
हे पण वाचा : शेतीची नांगरट कधी करावी? योग्य वेळ ओळखा, उत्पादन दुप्पट वाढवा
हवामान विभागाच्या अपडेट नुसार, राज्यातील कोकणपट्ट्यात मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात चांगलाच उष्णतेचा चांगलाच पारा वाढणार आहे. आद्रता इतकी जास्त आहे की फक्त तापमान नाही तर अंगाला चटका देणार उकडा सध्या नागरिकांना हैराण करतोय. मुंबईमध्ये देखील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्याच पार्श्वभूमी वरती नागरिकांना मोठा त्रास जाणू लागलेला आहे तर शेतकरी देखील अनाथ काम करताना त्यांच्या घामाच्या दारा जोरात वाहू लागले आहेत.
परंतु तसेच पश्चिम महाराष्ट्रातील चित्र पाहिला तर थोडंस वेगळं पाहायला मिळतं. कारण कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर या भागात सकाळपासूनच ऊन असलं तरी दुपारच्या वातावरण बदलण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कुसळू शकतात. शेतकऱ्यांसाठी हीच वेळ धोक्याची असते कारण व पीक काढणीस आलेला माल, भाजीपाला यावर अचानक पावसाचा फटका बसू शकतो. त्याचवेळी अनेक ठिकाणी शेतकरी आधीच मोठी खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळतात.
हे पण वाचा : उन्हाळ्यात कोणते पीक घ्यावे? कमी पाण्यात, जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांची खरी माहिती
मराठवाड्यात देखील असंच काही चित्र निर्माण झालेला आहे. लातूर, धाराशिव भागामध्ये दिवसभर उष्णता जाणारा असली तरी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झालेले पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडू शकतो. हा पाऊस थोडासा दिलासा देणारा असला तरी पण त्याच वेळी विजांचा कडकडाट आणि वारांचा वेग वाढला तर नुकसान देखील होऊ शकते. शेतकऱ्यांचे म्हणणं आहे की पाऊस येऊ दे परंतु शांत येऊ दे अशी म्हणणं सध्या पाहायला मिळत आहे.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र परिस्थिती अजून गंभीर आहे. या भागात पावसाचा काहीच अंदाज नाही, उलट उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार आहे. तापमान 39 ते 43 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडणं म्हणजे अंगावर जळजळणारा अनुभव अशा परिस्थितीत नागरिकांना उष्माघाताचा धोका वाढतो. शेतात काम करणाऱ्यांसाठी तर ही परिस्थिती अधिकच कठीण आहे.
हे पण वाचा : महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यामध्ये हवामान खात्याचा मोठा इशारा? शेतकऱ्यांनो या हवामान अंदाज आकडे लक्ष द्या
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव या भागातही उकाडा वाढणार आहे. पावसाची कोणतीही चिन्हं नाहीत, त्यामुळे जमीन कोरडीच राहणार. शेतकरी सांगतात, पाऊस आला तर नुकसान, नाही आला तर पिकं करपतायत म्हणजे दोन्हीकडून अडचणच आहे.
एकूण चित्र पाहिलं तर महाराष्ट्रात हवामान पूर्णपणे अस्थिर झालं आहे. काही भागात पाऊस, काही भागात प्रचंड उकाडा यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून शेतकऱ्यांपर्यंत सगळेच त्रस्त झाले आहेत. पुढील 24 तासांमध्ये परिस्थिती कशी बदलते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळावं, भरपूर पाणी प्यावं आणि शक्यतो सावलीत राहावं. तर शेतकऱ्यांनी काढणीस आलेली पिकं सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, जनावरांना उघड्यावर सोडू नये आणि वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली थांबू नये.
