Namo Shetkari Yojana Maharashtra: राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून गावाकडच्या चौकात, बाजारात अगदी चहाच्या टपऱ्यावर सुद्धा एकच चर्चा सुरू आहे नमो शेतकरीचा हप्ता आला का? कारण नुकताच नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा आठवा हप्ता लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती समोर आली आहे पण अजूनही अनेक शेतकरी गोंधळात आहेत, आपल्याला पैसे आलेत का नाहीत? यंदाच्या हप्त्यात तब्बल ८९ लाख ७४ हजार
शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले आहेत विशेष म्हणजे ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होत असल्यामुळे कोणत्याही दलालांचा प्रश्नच नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना थेट फायदा होत आहे वर्षाला चार महिन्यांच्या अंतराने २ हजार रुपये असे तीन हप्ते म्हणजे एकूण ६ हजार रुपये राज्य सरकारकडून दिले जातात आणि याचबरोबर केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेतून आणखी ६ हजार रुपये मिळतात म्हणजेच वर्षाला तब्बल १२ हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. Namo Shetkari Yojana Maharashtra
हे पण वाचा : नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जाहीर! शेतकऱ्यांनो तुमच्या खात्यात आले का पहा?
पण इथेच खरी अडचण सुरू होते कारण अनेक वेळा पैसे जमा झाले तरी काहींना माहितीच होत नाही मोबाईल नंबर अपडेट नसतो, बँक मेसेज येत नाहीत, किंवा खाते तपासायला वेळ मिळत नाही त्यामुळे आपल्याला पैसे मिळाले की नाही? हा प्रश्न कायम राहतो. मग ती आपण कशी चेक करायची ही माहिती आम्ही खालील प्रमाणे दिली आहे.
मात्र आता यासाठी सोपा मार्ग उपलब्ध आहे. घरबसल्या मोबाईलवरूनच तुम्ही तुमचा हप्ता तपासू शकता. त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करायचे त्यानंतर मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकायचा.कॅप्चा भरून OTP टाकला की तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही, किती हप्ते मिळाले सगळी माहिती समोर येत.
हे पण वाचा : 50 शेळी गट अनुदान योजना सुरू, पहा पात्रता आणि निकष कसा मिळेल लाभ
दरम्यान, काही गावांमध्ये अशीही स्थिती पाहायला मिळतेय की, शेजाऱ्याच्या खात्यात पैसे आलेत पण आपल्याकडे नाही अशा वेळी घाबरून जाण्याची गरज नाही कारण कधी कधी बँक प्रक्रियेमुळे पैसे येण्यास उशीर होतो तसेच खाते आधारशी लिंक नसेल, KYC पूर्ण नसेल तरही हप्ता अडकू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायचा आहे की आपली केवायसी आणि आपले कागदपत्रे व्यवस्थित असायला हवेत.
आता सध्या राज्यात अवकाळी पावसाचं संकट
डोक्यावर आहे गहू, कांदा, हरभरा या पिकांचं नुकसान होत असताना हा हप्ता शेतकऱ्यांसाठी थोडासा आधार ठरत आहे पण अनेक शेतकरी सांगतात, ही मदत उपयोगाची आहे, पण नुकसान मोठं आहे
हे पण वाचा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
म्हणूनच सरकारच्या या योजनेचा लाभ वेळेवर मिळणं खूप महत्त्वाचं आहे जर अजून तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर ताबडतोब स्टेटस तपासा, बँक आणि आधार लिंक तपास कारण ही रक्कम तुमच्या हक्काची आहे
एकंदरीत शेतकरी बांधव आजही मोबाईल हातात घेऊन एकच प्रश्न विचारतोय हप्ता आला का? आणि आता त्याचं उत्तर फक्त एका क्लिकवर मिळणार आहे
( डिस्क्लेमर: वरील दिलेली माहिती ही विविध प्रसारमाध्यम आणि माहितीस्त्रोतांच्या आधारे आहे योग्य माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित माहिती स्त्रोतांचा आधार घ्या. धन्यवाद आणि अशीच बातमी तुम्हाला हवी असेल तर आम्हाला फॉलो करत चला आणि ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा.)
