Kapush bajar bhav News : सकाळी बाजार समितीत शेतकरी उभा हातात जुनी पावती चेहऱ्यावर थोडीशी खंत आणि कानावर येणारी एकच गोष्ट आज कापसाला ८८००, ८९०० पर्यंत दर गेलाय हे ऐकताच मनात एकच विचार येतो आपण थोडा थांबलो असतो तर सध्या राज्यात कापूस बाजारात असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय दर वाढलेत बाजारात तेजी आली आहे पण या तेजीचा खरा फायदा मात्र बळीराजाला मिळत नाहीये हीच खरी शोकांतिका आहे. Kapush bajar bhav News
गेल्या काही दिवसांत कापसाच्या दराने जोरदार उसळी घेतली आहे काही बाजार समित्यांमध्ये दर थेट ९ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचलेत अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत तर कापसाला ८८४० ते ८९०० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचं चित्र आहे हा दर किमान आधारभूत किंमत (MSP) पेक्षा जास्त आहे म्हणजे कागदावर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी वाटते पण प्रत्यक्षात मात्र चित्र उलटं आहे.
कारण एक साधा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला छळतोय आता कापूस कुठे आहे? बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच आपला कापूस विकून टाकलाय तेही कमी दरात जेव्हा बाजारात ७००० ते ७५०० चा दर होता, तेव्हाच गरज, कर्ज, खर्च आणि घर चालवण्यासाठी त्यांनी माल विकला आणि आज जेव्हा दर ८५००-९००० पर्यंत पोहोचलेत, तेव्हा त्यांच्या गोदामात एकही पोत शिल्लक नाही त्यामुळे ही तेजी शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर घडतेय, पण त्याच्या हातात काहीच लागत नाहीये
अकोट बाजारात सध्या व्यापाऱ्यांची चांगलीच चढाओढ दिसतेय कारण बाजारात आवक कमी आहे आणि मागणी वाढली आहे मोठे व्यापारी, साठेबाज आता कापूस उंच दरात खरेदी करत आहेत आणि काही ठिकाणी आधीच साठवलेला कापूस विकून चांगला नफा कमावत आहेत म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी गरजेपोटी लवकर विक्री केली, ते नुकसाना आणि ज्यांच्याकडे साठा आहे ते फायद्यात ही विषमता स्पष्टपणे दिसून येतेय
यामागे कारणंही तितकीच गंभीर आहेत यंदाच्या खरीप हंगामात कापूस उत्पादनावर मोठा परिणाम झाला. सुरुवातीला पावसाचा खंड पडला, नंतर अचानक अतिवृष्टी झाली त्यात किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला त्यामुळे उत्पादन घटलं शेतकऱ्यांनी अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही आणि जेवढं मिळालं, तेवढंही तातडीच्या गरजांसाठी विकावं लागलं त्यामुळे बाजारात सध्या कापसाची उपलब्धता कमी झाली आहे आणि याच कारणामुळे दर वाढले आहेत
हमीभाव केंद्रांचाही अनुभव शेतकऱ्यांसाठी फारसा चांगला राहिला नाही अनेकांनी कापूस MSP वर विकण्यासाठी नोंदणी करण्याचा प्रयत्न केला पण ऑनलाइन प्रक्रियेत अडचणी आल्या काही ठिकाणी खरेदी उशिरा झाली तर काही ठिकाणी जाचक अटींमुळे शेतकरी त्रस्त झाले त्यामुळे किती दिवस थांबायचं? या प्रश्नामुळे त्यांनी खासगी व्यापाऱ्यांकडेच कमी दरात विक्री केली आणि आज त्याच कापसाला बाजारात जास्त दर मिळताना दिसतोय.
सध्या बाजारात एक वेगळीच स्थिती आहे आवक कमी, मागणी जास्त त्यामुळे तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांत दर आणखी वाढू शकतात पण याच वेळी एक कटू वास्तव आहे जर शेतकऱ्यांकडे कापूसच शिल्लक नसेल, तर या वाढीव दराचा फायदा त्यांना कसा मिळणार? त्यामुळे ही तेजी असूनही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान नाही, तर नाराजी दिसतेय.
गावाकडे गेलं तर अनेक शेतकरी एकच वाक्य बोलताना दिसतात दर वाढलेत, पण आपल्यासाठी उशीर झाला. ही भावना खूप काही सांगून जाते. कारण शेतकरी फक्त उत्पादन करत नाही, तर तो प्रत्येक वेळी बाजाराच्या चक्रात अडकतो. कधी दर कमी असतात, तेव्हा त्याच्याकडे माल असतो. आणि जेव्हा दर वाढतात, तेव्हा त्याच्याकडे माल नसतो. ही सायकल अजूनही तशीच सुरू आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ एक गोष्ट स्पष्ट सांगतात भविष्यात अशा परिस्थिती टाळायची असेल, तर शेतकऱ्यांनी साठवणूक, बाजाराचा अभ्यास आणि योग्य वेळ साधणं खूप गरजेचं आहे शक्य असेल तिथे कापूस साठवून ठेवावा, बाजारातील ट्रेंड समजून घ्यावा… आणि एकदम संपूर्ण माल विकण्याऐवजी टप्प्याटप्प्याने विक्री करावी म्हणजे काही प्रमाणात तरी चांगल्या दराचा फायदा मिळू शकतो.
एकूणच पाहता, कापूस बाजारात सध्या तेजी आहे. दर वाढले आहेत पण या वाढीचा आनंद शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. उलट थोडं थांबलो असतो तर ही खंतच जास्त दिसतेय आणि म्हणूनच ही बातमी फक्त दरवाढीची नाही, तर शेतकऱ्यांच्या मनातल्या वेदनेची आहे. बाजारात कापूस महाग झाला, पण बळीराजाच्या मेहनतीची खरी किंमत अजूनही त्याला मिळालेली नाही.
हे पण वाचा : युद्धामुळे कापूस दर पुन्हा तेजीत; जाणून घ्या नवीन कापूस बाजार भाव
