WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यात पुन्हा एकदा मोठा इशारा, या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आव्हान, तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aajche hawamaan Andaaz : आज सकाळी शेतात पाय टाकला की सगळं काही बदललेलं दिसतंय कालपर्यंत उन्हाने अंगाची काहिली होत होती, आणि आज अचानक ढग दाटून आले, वाऱ्याचा वेग वाढला आणि क्षणात गारपीट सुरू झाली अशीच काहीशी अवस्था सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दिसतेय मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय आणि आता तर तो आजही येणार. असा इशारा हवामान विभागाने दिल्यामुळे शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. पुढील २४ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून अनेक जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय. Aajche hawamaan Andaaz

काल पुण्यात जे दृश्य पाहायला मिळालं, ते पाहून अनेकजण हादरल दुपारच्या वेळेला अचानक काळोख पसरला, वाऱ्याचा जोर इतका होता की झाडं अक्षरशः हलत होती आणि काही क्षणातच मुसळधार पाऊस सुरू झाला. काही भागात तर गारपिटीने अक्षरशः थैमान घातलं. हीच परिस्थिती फक्त पुण्यापुरती मर्यादित नाही, तर सोलापूर, धाराशिव, नाशिक, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना या जिल्ह्यांमध्येही आज पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती खूपच गंभीर बनली आहे.

कारण सध्या अनेक पिके काढणीच्या टप्प्यावर आहेत. ज्वारी, गहू, कांदा, द्राक्ष यांसारखी पिके हातात येण्याच्या अगदी काही दिवसांवर असताना हा अवकाळी पाऊस त्यांच्यावर कोसळतोय. जळगाव जिल्ह्यातील चोपडा भागात काल झालेल्या वादळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की, हातात येणारा घासच निसर्गाने हिरावून घेतला. ही भावना फक्त एका गावापुरती नाही, तर संपूर्ण राज्यभरातील बळीराजाची झाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातही अशीच हृदयद्रावक परिस्थिती पाहायला मिळाली.चेनापूर गावात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ज्वारीचं उभं पीक पूर्णपणे आडवं केलं. काही शेतकऱ्यांनी तर कर्ज काढून शेती केली होती, आणि आता त्या कर्जाची परतफेड कशी करायची हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकलाय. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातही काल दुपारी चारच्या सुमारास अचानक वादळी पाऊस सुरू झाला. कानदळ, देवगाव, शिरवाडे वाकद, रुई, मानोरी फाटा या भागांमध्ये सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे कांदा, गहू आणि द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी काढणीसाठी ठेवलेला कांदा भिजून गेला, ज्यामुळे बाजारभावावरही परिणाम होण्याची शक्यता आहे…

दरम्यान, शिरपूर बाजार समितीतही मोठा फटका बसला.सलग सुट्ट्यांमुळे तीन दिवस व्यवहार बंद होते, आणि अचानक आलेल्या पावसामुळे तिथे साठवलेला शेतमाल पूर्णपणे भिजून गेला. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. व्यापाऱ्यांसोबतच शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात परिस्थिती अधिक गंभीर राहू शकते. काही भागात गारपीट होण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेगही ५० ते ६० किमी प्रतितास इतका राहू शकतो. त्यामुळे झाडं, वीजवाहिन्या आणि उघड्यावर ठेवलेला शेतमाल यांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

या सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. काढणीस आलेली पिके शक्यतो लवकरात लवकर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. कांदा, द्राक्ष यांसारखी पिके झाकून ठेवावीत. तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावं. कारण विजांच्या कडकडाटामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे जनावरांनाही धोका निर्माण होऊ शकतो.

नागरिकांसाठीही हा इशारा तितकाच महत्त्वाचा आहे. अनावश्यक प्रवास टाळावा, विजांचा कडकडाट सुरू असताना घराबाहेर पडू नये झाडाखाली किंवा उघड्या जागेत थांबणं टाळावं. कारण अशा वेळी विजा पडण्याचा धोका अधिक असतो

एकूणच पाहता, एप्रिल महिना सुरू झाला असला तरी हवामानाने अजूनही आपला रंग बदललेला नाही. उलट दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. शेतकऱ्यांसाठी हा काळ खूप कठीण आहे एका बाजूला कर्जाचं ओझं, आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाचा हा कहर त्यामुळे आता सर्वांचं लक्ष सरकारकडे लागलं आहे पंचनामे, नुकसान भरपाई आणि तातडीची मदत मिळाली तरच बळीराजा या संकटातून सावरू शकतो अन्यथा तो आजही येणार हा पावसाचा इशारा अनेकांच्या आयुष्यात आणखी अंधार घेऊन येऊ शकतो.

हे पण वाचा : विजांपासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबू नका! पंजाबराव डख यांचा कडक सल्ला; अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार!

Leave a Comment