Aajche gahu bajar bhav : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सध्या एकीकडे बाजारात गव्हाच्या दरांमध्ये चांगली हालचाल सुरू झाली आहे, तर दुसरीकडे आभाळात जमलेले ढग आणि अवकाळी पावसाचा वाढता धोका यामुळे काळजीचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल होत असल्यामुळे शेतकरी वर्ग आधीच तणावाखाली आहे आणि अशातच आज २ एप्रिल रोजी आलेल्या गहू बाजारभावाच्या आकडेवारीने काहींना दिलासा दिला तर काहींना चिंता वाढवली आहे. कारण काही बाजारात दर ४ हजारांच्या पुढे गेले असताना काही ठिकाणी अजूनही २ हजाराच्या आसपासच दर फिरताना दिसत आहेत. Aajche gahu bajar bhav
आज राज्यभरात गव्हाची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून विशेषतः लासलगाव-विंचूर येथे तब्बल २३६४ क्विंटल गहू बाजारात दाखल झाला… येथे गव्हाला सरासरी २३०० रुपये दर मिळाला, जो सध्याच्या परिस्थितीत स्थिर मानला जातो सिन्नर-हिवरगाव येथे कमी आवक असली तरी दर २३०० च्या आसपास टिकून आहेत पाचोरा बाजारात १००० क्विंटल आवक झाली असून सरासरी दर २२०० रुपये मिळाला करमाळा बाजारात दर थेट २४०० पर्यंत गेले, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे
मराठवाड्यातील काही बाजारात मात्र परिस्थिती मिश्र आहे तुळजापूर येथे २३२५ रुपये सरासरी दर मिळाला, तर लातूर-मुरुड येथे २१११ रुपयांपर्यंत दर खाली आले नेवासा बाजारात मात्र गव्हाने जोर धरला असून थेट २६०० रुपये दर मिळाला आहे, जो आजच्या दिवसातील चांगल्या दरांपैकी एक मानला जातो दुधणी बाजारातही २७०० रुपये दर मिळाल्याने इथल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.
विदर्भात नागपूर बाजारात मोठी आवक पाहायला मिळाली तब्बल ३००० क्विंटल गहू बाजारात आला, मात्र सरासरी दर २१८७ रुपये राहिला हिंगणघाट येथे दर २१०० च्या आसपास स्थिर आहेत जालना बाजारात ३१६१ क्विंटल आवक झाली असून सरासरी २२५० रुपये दर मिळाला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दर २११८ रुपयेपर्यंत राहिले
पण खरी चर्चा सध्या मुंबई, पुणे आणि सोलापूर बाजाराची सुरू आहे कारण इथे गव्हाचे दर अक्षरशः उसळी घेताना दिसत आहेत मुंबई बाजारात गव्हाला ५००० रुपयांपर्यंत कमाल दर मिळाला असून सरासरी ३९५० रुपये आहे उल्हासनगरमध्ये ३२०० रुपये, तर पुण्यात शरबती गव्हाला तब्बल ४३५० रुपये दर मिळाला आहे सोलापूरमध्येही शरबती गहू ३२७५ रुपयांपर्यंत गेला आहे त्यामुळे दर्जेदार गव्हाला बाजारात चांगली मागणी असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
मात्र भाऊ, इथेच खरी गोष्ट सुरू होते कारण बाजारात दर वाढत असतानाच आभाळातले ढग शेतकऱ्यांची झोप उडवत आहेत हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील २-३ दिवस राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा जोर वाढणार आहे विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे
गेल्या आठवड्यातही अशाच अवकाळी पावसाने अनेक भागात गहू, हरभरा आणि इतर पिकांचे नुकसान केले होते अनेक शेतकऱ्यांनी काढणीसाठी तयार असलेला गहू शेतातच भिजून गेल्याचं दुःख व्यक्त केलं होतं आता पुन्हा तसंच चित्र निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण आहे कारण सध्या अनेक ठिकाणी गहू काढणीच्या टप्प्यात आहे. अशा वेळी पाऊस आला तर थेट उत्पादन आणि गुणवत्तेवर परिणाम होतो
विशेषतः नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, जालना, लातूर, नांदेड या भागांमध्ये पुढील २४ ते ४८ तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत… काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळू शकतो… त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य तितक्या लवकर काढणी करून गहू सुरक्षित ठिकाणी साठवण्याचा सल्ला दिला जात आहे
आजची परिस्थिती पाहिली तर एकीकडे बाजारात गव्हाचे दर वाढत आहेत, विशेषतः चांगल्या दर्जाच्या गव्हाला मोठी मागणी आहे पण दुसरीकडे हवामानाचा धोका अजूनही कायम आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा काळ खूपच निर्णायक ठरणार आहे. योग्य वेळी निर्णय घेतला तर चांगला नफा मिळू शकतो, पण थोडासा उशीर झाला तरी मोठं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाह
एकंदरीत पाहिलं तर सध्या दर चांगले पण धोका मोठा अशी परिस्थिती गहू उत्पादकांसमोर उभी आहे… त्यामुळे सावध राहणं, हवामानाचा अंदाज लक्षात ठेवणं आणि पिकाचं संरक्षण करणं हेच सध्या शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचं ठरत आहे.
(बातमीस्त्रोत : महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ)
हे पण वाचा: आजचे गहू बाजारभाव | महाराष्ट्रातील आजचे ताजे बाजार भाव
