WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता; जाणून घ्या नवीन हवामान अंदाज..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Forecast: राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये विशेषता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावा लागू शकते. 27 जानेवारी रोजी अचानक कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या जिल्ह्यातील सुमारे 21 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून गहू हरभरा ज्वारी कांदा यासारख्या रब्बी पिकांना जबरदस्त अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असल्यामुळे, राज्यातील बंधार्‍यांमध्ये आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा आधीच मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पडलेल्या कडाकाच्या थंडीमुळे रब्बी पिके चांगल्या प्रमाणात बहरली आहेत. शेतकऱ्यांना यंदा रब्बी हंगाम चांगलं उत्पन्न देईल अशी अपेक्षा लागली होती. मात्र पीक काढणीच्या कालावधीमध्ये अचानक सुरू झालेल्या या अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाला आहे.

या महिन्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

हवामान अभ्यासाकांच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाला शेतकऱ्यांना सामोरे जावा लागू शकते. या काळात थंडीचा प्रभाव कमी होत जातो आणि तापमानात हळूहळू बदल होत असतो. वाढत्या तापमानामुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन वाढते आणि वातावरणात वादळी परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात होते. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दोन ते तीन वेळा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जाऊ शकते. असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

‘एल निनो’चा प्रभाव आणि बदलते वातावरण

यावर्षी ‘एल निनो’चा प्रभाव स्पष्टपणे जाणवत असून, त्यामुळे वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. जानेवारी महिन्यात बहुतांश काळ ढगाळ वातावरण राहिले. थंडीची लाट फारशी तीव्र न राहिल्याने हवामान अस्थिर झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार फेब्रुवारीच्या मध्यापासून ते मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुन्हा वादळी व अवकाळी पावसाचे सावट राहू शकते. याचा थेट परिणाम रब्बी पिकांच्या काढणीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शेतकरी हवालदिल, नुकसानभरपाईची मागणी

अवकाळी पावसामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. पीक कर्ज, वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याने नुकसान पंचनामे करून तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. फेब्रुवारी–मार्च महिन्यात पुन्हा पाऊस झाल्यास नुकसान आणखी वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी सध्या आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

हवामानाच्या लहरीपणामुळे शेती दिवसेंदिवस अधिकच जोखमीची होत चालली आहे. रब्बी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आलेले हे अवकाळी संकट शेतकऱ्यांसाठी मोठी परीक्षा ठरत आहे. शासनाने हवामान अंदाजाच्या आधारे योग्य नियोजन करत शेतकऱ्यांना वेळीच मदत केली, तरच या संकटातून शेतकरी सावरू शकतो. अन्यथा, फेब्रुवारी आणि मार्च हे महिने शेतकऱ्यांच्या आयुष्यात पुन्हा एक काळा अध्याय ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. Weather Forecast

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment