SBI Home Loan | नवीन घराचे स्वप्न पाहणारे नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. जर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. गेल्या काही महिन्यात प्रॉपर्टीच्या किमती आकाशाला भिडले आहेत, सामान्य मध्यवर्गीय कुटुंबाला स्वतःचं घर यायचा असेल तर होम लोन सर्वात भारी पर्याय आहे.
दरम्यान, बँका सुद्धा ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देते आहे. यावर्षी तर होम लोन वरचे इंटरेस्ट रेट प्रचंड कमी झाले आहेत देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने देखील व्याजदर कमी केले आहेत.
RBI चा मोठा निर्णय !
2025 मध्ये आतापर्यंत RBI ने रेपो रेट मध्ये 1% कपात केली आहे. याचा थेट फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. त्याचबरोबर बँकेनी होम लोन सहित सर्व कर्जावरचे व्याजदर कमी केले आहे. त्याच अनुषंगाने SBI ने होम लोनचे व्याजदर कमी करून किमान 7.50% व्याजदर गृह कर्ज उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
कोणाला मिळणार 7.50% व्याज दर :
- हा सुरुवातीचा व्याजदर असून हा प्रत्येकाला लागू होत नाही हा फायदा मिळवण्यासाठी काही अटी आहेत .
- तुमचे क्रेडिट स्कोर 750+असावा
- नोकरी सुरक्षित म्हणजेच तुमची इन्कम चांगली अशी पाहिजे.
- ग्राहकांवर इतर सक्रिय कर्ज नसावे
- 30 लाखाचे होम लोन घेण्यासाठी किती पगार हवा ?
जर तुम्ही SBI कडून 30 लाखाचे गृह कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, तुमचा मासिक पगार किमान 42,000 असणे आवश्यक आहे. तुमची नोकरी प्रायव्हेट किंवा सरकारी दोन्ही चालेल. त्याचबरोबर इतर कोणतीही कर्ज नसल्यास कर्ज मंजूर सहज होते.
गरजेने हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि हे स्वप्न आता SBI च्या नवीन कमी व्याजदरामुळे साकार होणार आहे. तर पगार 42,000 असेल 30 लाखाचे होम लोन तुम्हाला अगदी सहज मिळणार आहे. अर्थातच सर्व अटी पूर्ण केल्या तरच हा फायदा मिळू शकतो म्हणूनच कर्ज घेण्यापूर्वी सिबिल स्कोर नोकरीची स्थिती आणि EMI क्षमता तपासने गरजेचे आहे.
