EPFO 5 Rule News | भविष्य निर्वाह निधी संघटनेने देशभरातील पेन्शन धारकांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत पेन्शन सुरू राहावी यासाठी पेन्शनधारकांना दरवर्षी बँकेत किंवा EPFO ऑफिसमध्ये जाऊन जीवन प्रमाणपत्र जमा करावा लागत होतं. अनेक वृद्ध नागरिकांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागायचा पण आता ही धावपळ संपणार आहे.
पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे , EPFO ने इंडिया पोस्ट पेमेंट बँकेसोबत नवी सेवा सुरू केली आहे. ज्यामुळे पेन्शन धारक घरबसल्या डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकतात ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा दिलासा देणारी आहे.

जीवन प्रमाणपत्र म्हणजे काय ?
पेन्शन धारक जिवंत आहेत याची खात्री करण्यासाठी दरवर्षी हे प्रमाणपत्र पेन्शन धारकाकडून सरकार मागवतात. त्यामुळे अनेक वृद्ध पेन्शन धारक यांना धावपळ करावी लागते परंतु आता हे धावपळ बंद होणार आहे. जर तुम्ही हे सर्टिफिकेट सादर केले नाही तर तुमची पेन्शन थांबते.
कसं मिळणार डिजिटल जीवन प्रमाणपत्र ?
- सर्वप्रथम तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत जावे लागणार आहे.
- यानंतर फेस आणि फिंगरप्रिंट बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन पूर्ण करायचे आहे.
- प्रक्रिया EPFO कडून पूर्णपणे मोफत आहे.
- आता तुम्हाला कुठेही जास्त जाण्याची गरज नाही तुम्ही घरी बसल्या हे काम पूर्ण करू शकतात.
या तारखेपर्यंत जमा करा तुमचे जीवन प्रमाणपत्र ?
1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये सर्व पेन्शन पेन्शनधारकांनी हे प्रमाणपत्र जमा करायचे आहे. 80 वर्षावरील नागरिक 1 ऑक्टोबर पासूनच प्रक्रिया सुरू करू शकतात उशीर झाल्यास पेन्शन थांबू शकते त्यामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.

EPFO चे 5 नवे डिजिटल नियम :
1. घरी बसल्या डिजिटल लाइफ सर्टिफिकेट जमा करता येणार .
2. बायोमेट्रिक वेरिफिकेशन
3. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची संगत
4. प्रक्रिया पूर्णपणे मोफत
5. नोव्हेंबरमध्ये सर्टिफिकेट अनिवार्य
ही सर्विस कोणाला फायदेशीर ?
पूर्वी प्रमाणपत्रासाठी पंधरा ते वीस किलोमीटर प्रवास करावा लागायचा परंतु आता तुमच्या गावातील कर्मचारी ही सेवा तुम्हाला देणार आहे. अनेक शेतकरी, कामगार, निवृत्त अधिकारी सर्वांच्या घरात ही बातमी सध्या चर्चेमध्ये आहे कारण यामुळे वेळ आणि खर्च वाचणार आहे शिवाय त्रास देखील कमी होणार आहे.
