Police Bharti 2025 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यातील हजारो तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पोलीस भरती करणाऱ्या तरुणांना आता एक मोठी संधी निर्माण झाली आहे, महाराष्ट्र सरकारने पोलीस भरतीला मंजुरी देत राज्यातील पोलीस भरती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबर पासून सुरू झाली आहे. ही भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना आजपासून एक महिनाभर अर्ज भरता येणार आहे.
हे पण वाचा : पोलीस भरतीला अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्रं तयार ठेवा नाहीतर पश्चात्ताप होईल! लगेच पहा संपूर्ण यादी
महाराष्ट्र पोलीस भरती 2025 याकरिता राज्यात तब्बल 15,631 पदांसाठी ही भरती राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध रिक्त पदांकरिता अर्ज मागवले जाणार आहेत ज्यामध्ये पोलीस शिपाई पदांकरिता 12399 रिक्त पदे आहेत. चालक शिपाई करिता 234 पद, सशस्त्र पोलीस शिपाई करिता 2393, कारागृह पोलीस शिपाई 598 वित्त पदे तर बँड्समनकरिता 25 रिक्त पदे. या रिक्त पदांकरिता ऑनलाइन प्रकारे अर्ज मागवली जाणार आहेत.
जर तुम्ही देखील या पदाकरिता अर्ज करण्याचा विचार करीत असाल तर तुम्हाला या भरती करिता ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम policerecruitment2025.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. या संकेतस्थळ तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या आधार क्रमांक टाकून साइन इन करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला तुमची शैक्षणिक पात्रता आणि तुमची सर्व माहिती भरून अर्ज भरायचा आहे.
हे पण वाचा : पोलीस भरतीला अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्रं तयार ठेवा नाहीतर पश्चात्ताप होईल! लगेच पहा संपूर्ण यादी
या भरती करिता तुम्हाला 29 ऑक्टोबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये तुमचा अर्ज भरून घ्यायचा आहे. या भरतीकरिता दोन टप्प्यांमध्ये प्रक्रिया होणार आहे पहिला टप्पा म्हणजे शारीरिक चाचणी ही 50 गुणाची असणार आहे आणि नंतर लेखी परीक्षा 100 गुणांची होणार आहे. या दोन्ही परीक्षेचे एकत्रित गुणांवर अंतिम निवड होणार आहे.
हे पण वाचा : पोलीस भरतीला अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्रं तयार ठेवा नाहीतर पश्चात्ताप होईल! लगेच पहा संपूर्ण यादी
