10th 12th Exam Timetable :- नमस्कार मित्रांनो यावर्षी इयत्ता दहावी व बारावीच्या महत्त्वाच्या बोर्डाच्या परीक्षा दरवर्षीपेक्षा दहा दिवस अगोदर घेण्याचे बोर्डाचे नियोजन आहे.बोर्डाच्या परीक्षेचे होणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग , कॅमेरे नसल्यास परीक्षा केंद्र होणार रद्द, असा निर्णय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.
10th 12th Exam Timetable
पण पुणे बोर्डाने तयार केलेले वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडचण निर्माण होऊ शकते. यासाठी बोर्डाने निवडणूक आयोगाच्या वरिष्ठांकडे विचारणा केली असून निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यावर लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाईल, किंवा मतदान पार पडल्यावरच टाईम टेबल जाहीर केले जातील असे बोर्डातील वरिष्ठांनी सांगितले आहे.
इयत्ता बारावीच्या परीक्षा 11 फेब्रुवारीपासून व इयत्ता दहावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून होणार आहेत. या आधी, विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा घेतल्या जातील. परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शक पद्धतीने पार पाडावीत त्यासाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावली जाणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सध्याचे परीक्षा वेळापत्रक जाहीर केल्यावर या वेळापत्रकावर काही हरकती किंवा अडथळा आहे काय हे पाहण्यासाठी बोर्डाने राज्यभरातून हरकती मागविल्या होत्या. व मंडळाला फक्त 40 साध्या किरकोळ हरकती प्राप्त झाल्या, म्हणून बोर्डाने हे वेळापत्रक अंतिम करण्याचे ठरविले .(10th 12th Exam Timetable)
तसेच दहा दिवस अगोदर होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक आचारसंहितेत मांडता येईल का यावर वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. यासाठी यावर्षी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होण्यासाठी अजून काही कालावधी लागेल, असे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे का आवश्यक ?
तसेच आता बोर्डाच्या परीक्षेचे होणार सीसीटीव्हीत रेकॉर्डिंग यावर्षी परीक्षेच्या पारदर्शकतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहेत,
या सीसीटीव्ही चा फायदा परीक्षेत तर होणारच तसेच स्कूल कॉलेज व विद्यार्थी यांच्या सुरक्षेमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा मोलाचा वाटा राहणार आहे, तसेच शिक्षण मंत्री यांच्या जवळ देखील सुरक्षेचा मुद्दा मांडण्यात आला होता तेव्हा त्यांनी महाराष्ट्र सरकार यांच्याकडून जीआर काढला आहे या जीआर मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे स्कूल व कॉलेज आहेत सरकारी व प्रायव्हेट यामध्ये सुरक्षा चांगली असली पाहिजे.
सर्व मुलांची सुरक्षेची काळजी घेण्यात आली पाहिजे. यामध्ये सर्वात मोठा मुद्दा म्हणजे सीसीटीव्ही आहे, राज्य सरकारने दोन वर्षे अगोदरही सर्व शाळांना आदेश दिले होते की सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही अपेक्षित आहेत यामुळे कोणत्याही अनुचित घटना पाहता आल्या पाहिजेत.
तरीपण असे निदर्शनात आले की वारंवार वरिष्ठांनी सूचना देऊनही सीसीटीव्ही लावण्यात हलगर्जीपणा झालेला आहे, पण यावर्षी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही अपेक्षित आहे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यास परीक्षा केंद्र रद्द असे शिक्षण मंत्री यांनी आदेश दिले आहेत.
त्याचबरोबर शिक्षण मंत्री यांनी सांगितले की शाळा व कॉलेजेस यांच्या सुरक्षेची बाब गंभीर आहे याला दुर्लक्ष करून चालणार नाही त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य आहेत.
तसेच ज्या शाळांना व कॉलेजेस ना ग्रँड मिळतो त्यांनी त्वरित शाळेत व कॉलेजमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत अन्यथा सरकारकडून मिळणारा ग्रँड व शिक्षकांना मिळणारा पगार मिळणार नाही असे निर्देश शिक्षण मंत्री यांनी दिले आहेत.
तसेच मागील काही वर्षात असे निदर्शनात आले की बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी पेपर लिक होणे मोबाईल फोन द्वारे कॉपी करणे व्हाट्सअप द्वारे पेपरचे फोटोज वायरल करणे आशा घटनांना आळा घालण्यासाठी देखील सीसीटीव्ही महत्त्वाचा ठरेल, ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही नसेल ते परीक्षा केंद्र रद्द करण्यात येतील.
वरिष्ठांनी असे आदेश दिले आहेत की दहावी व बारावी यांच्या बोर्डाच्या परीक्षा अगोदर सर्व केंद्रांना भेटी देऊन सीसीटीव्ही कॅमेरे चालू अवस्थेत आहेत की नाहीत याची पडताळणी करतील.
सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यास किंवा बंद अवस्थेत असल्यास परीक्षा केंद्र रद्द करण्यात येईल व कारवाई देखील करण्यात येईल असे सूचना शिक्षण मंत्री यांनी दिले आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेचा जास्त अभ्यास व सराव करणे खूप महत्त्वाचा आहे, कारण यावर्षी परीक्षा दहा दिवस अगोदर घेण्यात येणार आहे व परीक्षा पूर्ण पारदर्शक घेण्यात येणार आहे यासाठी आतापासूनच परीक्षेला सामोरे जायची तयारी ठेवा. चांगला अभ्यास करा व मेहनतीने चांगल्या मार्क्सने परीक्षेत यशस्वी व्हा.
10th व 12th वेळापत्रक 10th 12th Exam Timetable
1. इयत्ता दहावी – लेखी परीक्षा : 21 फेब्रुवारी ते 17 मार्च
2. इयत्ता बारावी – लेखी परीक्षा : 11 फेब्रुवारी ते 18 मार्च
यावर्षी बोर्डाची परीक्षा दहा दिवस अगोदर घेण्याचे कारण ?
1) परीक्षा लवकर घेतल्यास विद्यार्थ्यांना नीट व जेईई परीक्षे च्या अभ्यासासाठी वेळ मिळेल.
2) परीक्षांचा निकाल दरवर्षीपेक्षा लवकर लागेल.
3) परीक्षेत यश आलेल्या विद्यार्थ्यांनाही पुढील प्रवेशास अडचण निर्माण होणार नाही.
1 thought on “10th 12th Exam Timetable Best यावर्षी होणार 10 दिवस अगोदर परीक्षा, पहा टाईम टेबल”